सॅमसंगने आपल्या Galaxy M53 5G स्मार्टफोनची लाँच तारीख जाहीर केली आहे, हा स्मार्टफोन २२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता लाँच केला जाईल. या वर्षातील सॅमसंगचा M सीरीजचा हा दुसरा स्मार्टफोन आहे, याआधी कंपनीने M33 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. जर तुम्हाला हा Galaxy M53 5G खरेदी करायचा असेल तर तुम्ही Amazon India च्या वेबसाइटवर जाऊन Notify Me वर क्लिक करून मागवू शकता. याशिवाय हा स्मार्टफोन सॅमसंगच्या वेबसाइटवरही उपलब्ध असेल.

सॅमसंग Galaxy M53 5G स्मार्टफोनच्या आधी, कंपनीने गेल्या वर्षी M52 5G स्मार्टफोन देखील लाँच केला होता. त्याची किंमत २५,९९९ रुपये आहे. त्यामुळे Galaxy M53 5G स्मार्टफोनची किंमत देखील २६ हजारांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे. Amazon India च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन sAMOLED + Infinity-O डिस्प्ले आणि Cornic Gorilla Glass संरक्षणासह असेल. स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120HZ असेल, यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाची स्क्रीन उपलब्ध असेल.

WhatsApp New Feature: ३२ लोकांचा ग्रुप कॉल, मोठ्या फाइल्स देखील शेअर करता येणार

सॅमसंग Galaxy M53 5G स्मार्टफोनच्या लीक झालेल्या तपशीलांनुसार, या स्मार्टफोनला क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल. १०८ एमपी प्राथमिक कॅमेरा ८ एमपी अल्ट्रा वाइड, २ एमपी मॅक्रो आणि २ एमपी डेप्थ सेन्सर मिळेल. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी मिळेल. जी २५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सॅमसंग Galaxy M53 5G स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimension 900 प्रोसेसर उपलब्ध असेल.