Samsung ही एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. असाच एक नवीन स्मार्टफोन कंपनीने भारतामध्ये लॉन्च केला आहे. Galaxy F54 हा फोन लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये फास्ट चार्जिंग आणि चांगला बॅटरी सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Galaxy F54 चे फीचर्स

नवीन Samsung Galaxy F54 मध्ये ६.७ इंचाचा स्क्रीन आहे. त्याचा रिफ्रेश रेट १२० Hz इतके आहे. यामध्ये AMOLED डिस्प्ले मिळतो. मोबाईलच्या डिस्प्लेचे नुकसान होऊ नये म्हणून स्क्रीनवर गोरिला ग्लासचे ५ कोटिंग देण्यात आले आहे. याचे बॅक कॅमेऱ्याचे डिझाईन फ्लॅगशिप Galaxy S23 फोन सारखाच आहे. हा फोन कंपनीच्या होम-ब्रूड Exynos 1380 चिपसेटद्वारे समर्थित आहे, जे अलीकडे लॉन्च झालेल्या Galaxy A34 ला देखील पॉवर करत आहे. ५ जी फोन लेटेस्ट अँड्रॉइड १३ OS वर चालतो. सॅमसंग कंपनी ४ वर्षांचे OS अँडग्रेड आणि ५ वर्षांचा सुरक्षा पॅच देण्याचे आश्वासन देत आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

हेही वाचा : Apple WWDC 2023: अ‍ॅपलने MacBook Air लॉन्च करताच ‘या’ महागड्या लॅपटॉपच्या किंमतीत केला बदल, जाणून घ्या नवी किंमत

नव्याने लॉन्च झालेला सॅमसंग Galaxy F54 मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. त्यामध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.सॅमसंगच्या या फोनमध्ये वापरकर्त्यांना ६००० mAh क्षमतेची बॅटरी जी एका दिवसापेक्षा जास्तीचा बॅकअप देते. त्याला २५ W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे . हा फोन चार्जरसह दिला जात नाही. चार्जर खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किंमत

Samsung Galaxy F54 या फोनची सुरूवातीची किंमत ही भारतामध्ये २७,९९ रुपये आहे. ही किंमत १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. दुपारी ३ वाजल्यापासून फ्लिपकार्टवरून ३ वाजल्यापासून प्री-ऑर्डरची उपलब्ध होणार आहे. तसेच त्याची विक्री देखील याच प्लॅटफॉर्मवरून केली जाणार आहे.