How To Boost Smartphone Battery: स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये बिघाड झाल्यास फोन सतत चार्ज करावा लागतो. खरं तर फोन आणि त्यातील बॅटरी कालातंराने जुनी होते. त्यामुळे बॅटरीला ठराविक काळानंतर चार्ज होल्ड करणे शक्य होत नाही. त्यामुळे बॅटरी जास्त वेळ टिकत नाही. सध्या ऑफिसची बरीचशी कामे स्मार्टफोनद्वारे केली जातात. तेव्हा महत्त्वपूर्ण काम करायचे असताना चार्जिंग संपल्यामुळे काम बिघडू शकते. याव्यतिरिक्त प्रवासादरम्यान चार्जिंग संपल्याने फोन स्विचऑफ होणे त्रासदायक ठरु शकते.

अशा गोष्टी घडू नयेत यासाठी मोबाईलची बॅटरी जास्त काळ टिकून राहणे आवश्यक असते. बॅटरीसंबंधित समस्या उद्भवू नयेत यासाठी काही सोप्या ट्रिक्सची मदत घेता येते.

ब्राइटनेस मीडियम लेव्हलवर ठेवा.

ब्राइटनेसद्वारे मोबाइलची बॅटरी वाया जाऊ शकते. मीडियम लेव्हल ब्राइटनेसमुळे २० ते ३० टक्के बॅटरी चार्ज वाचवता येतो. यामुळे डोळ्यांना त्रासदेखील होत नाही. या सोप्या ट्रिकचा नक्की फायदा होईल.

अल्ट्रा गेम मोड बंद ठेवा.

जर तुम्ही स्मार्टफोनमधील अल्ट्रा गेम मोड बंद ठेवलात, तर तुमचा फोन अधिक कालावधीसाठी सुरु राहिल. गेमिंग मोडमुळे स्मार्टफोनमधील बरीचशी बॅटरी खर्च होत असते.

आणखी वाचा – “ChatGPT सारखं टूल बनवण्याचा प्रयत्न करु शकता पण..” OpenAI सीईओ सॅम ऑल्टमन यांचे भारत भेटीदरम्यानचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

वायब्रेशन मोड ऑफ करा.

वायब्रेशन मोडमुळे फोनची बॅटरी विनाकारण वापरली जाते असे काहीजणांचे मत आहे. त्यामुळे वायब्रेशन मोड बंद करुन फोन नॉर्मल मोडवर ठेवल्याने चार्जिंग लवकरच संपत नाही.

काम झाल्यावर टॅब्स बंद करणे.

मोबाइलवर वेगवेगळे टॅब्स आपण वापरत असतो. हे टॅब्स बंद न केल्यास त्यांच्यामार्फत फोनची बॅटरी खर्च होऊन स्मार्टफोन स्विच ऑफ होऊ शकतो. त्यामुळे हे टॅब्स काम पूर्ण झाल्यावर बंद करावेत.

आणखी वाचा – Twitter जाहिरातींच्या मोबदल्यात कन्टेंट क्रिएटर्संना देणार पैसे, एलॉन मस्क यांची मोठी घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फोन पूर्णपणे चार्ज करु नये.

काहीजणांनी फोन १०० टक्के चार्ज करायची सवय असते. असे केल्याने बॅटरीवर परिणाम होऊ शकतो. स्मार्टफोन नेहमी ८० किंवा ९० टक्के चार्ज करावा. यामुळे फोनची बॅटरी जास्त काळासाठी टिकून राहते.