संगीत प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. Spotify आपल्या वापरकर्त्यांना दिवाळी ऑफर अंतर्गत चार महिने मोफत Spotify प्रीमियम सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे ज्याचा एक चाचणी म्हणून तुम्हाला लाभ घेता येईल. आता चार महिन्यांसाठी, वापरकर्त्यांना चाचणी पॅक अंतर्गत कोणतीही रक्कम खर्च करण्याची आवश्यकता नाही. खरं तर, Spotify ने फक्त भारतीय वापरकर्त्यांसाठी त्याचे फ्री ट्रायल प्लॅन अपडेट केले आहे. Spotify चे प्रिमियम सबस्क्रिप्शन पूर्ण चार महिन्यांसाठी मोफत उपलब्ध आहे. ही ऑफर केवळ देशात २४ ऑक्टोबरपर्यंत वैध आहे.

एकदा मोफत कालावधी संपल्यानंतर, तुमच्याकडून ११९ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, तुम्हाला ते ऑटो-डेबिट करण्यापूर्वी कधीही रद्द करू शकता. कंपनीने सांगितले की, जर तुम्हाला Spotify च्या प्रीमियम सबस्क्रिप्शनमध्ये स्वारस्य असेल तर त्वरा करा. तुम्ही ऑफरचा लाभ कसा घेऊ शकता आणि जाहिरातमुक्त संगीत ऐकण्याचा आनंद कसा घेऊ शकता ते बघुयात…

आणखी वाचा : दिवाळी सेलिब्रेशन! जीओचा ‘ही’ ऑफर आपल्याला वर्षभर ठेवेल ‘अ‍ॅक्टीव’

SPOTIFY प्रीमियम चार महिन्यांसाठी मोफत स्टेप
– प्रथम तुम्हाला Spotify ॲप उघडावे लागेल.
– आता तुम्हाला उजव्या कोपऱ्यात प्रीमियम वर टॅप करावे लागेल.
– आता तुम्हाला प्रीमियम वैयक्तिक प्लॅनवर टाइप करावे लागेल. यासाठी तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड जोडणे आवश्यक आहे. किंवा, तुम्ही तुमचे UPI तपशील देखील जोडू शकता आणि सुरू ठेवू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संगीत सेवेच्या प्रीमियम प्लॅनमध्ये जाहिरातमुक्त ऐकणे, विनामूल्य अमर्यादित डाउनलोड आणि हाय कॉलिटीचे संगीत असे अनेक फायदे आहेत. तुम्ही तुमचे आवडते ट्रॅक ३२० kbps वर ऐकू शकता.