scorecardresearch

५ हजार mAh बॅटरी आणि तगड्या स्टोरेजसह लाँच झाला Tecno Spark Go 2023; जाणून घ्या फीचर्स

Techno: चला, जाणून घेऊयात या स्मार्टफोन्सची खासियत.

५ हजार mAh बॅटरी आणि तगड्या स्टोरेजसह लाँच झाला Tecno Spark Go 2023; जाणून घ्या फीचर्स
Tecno Spark Go 2023 – (image Credit- Tecno )

Techno या कंपनीने आजच (२३ जानेवारी) Spark Go 2023 हा स्मार्टफोन भारतामध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Spark Go 2022 चे अपग्रेड मॉडेल आहे. जे मागच्या वर्षी लाँच करण्यात आले होते. चला, जाणून घेऊयात या स्मार्टफोन्सची खासियत.

Spark Go 2022 चे काय आहेत फीचर्स ?

Techno या कंपनीने आपला Spark Go 2023 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. त्यामध्ये कंपनीने डिझाईनमध्ये बदल केला आहे. तसेच अपग्रेड केल्यामुळे त्यात नवीन फीचर्स पण देण्यात आली आहेत. या स्मार्टफोनमध्ये ६.५६ इंचाचा IPS LCD डिस्प्ले येतो. ४८० नीटस इतका डिस्प्लेचा ब्राईटनेस वाढवता येतो. हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ स्वरूपात येतो.

हेही वाचा : OnePlus 11R 5G स्मार्टफोनचे फीचर्स झाले लीक; कंपनीने लाँचिंगची तारीख केली जाहीर

तसेच या फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज वापरकर्त्यांना वापरायला मिळणार आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने इंटर्नल स्टोरेज पर्यंत वाढवता येते. या फोनमध्ये ड्युअल बॅक कॅमेरा येतो. १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा येतो. ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. 10W USB Type C चे चार्जिंगचे फिचर आणि ५००० mAh इतक्या क्षमतेची बॅटरी येते. याची बॅटरी ३२ दिवस स्टॅण्डबाय मोडवर चालू शकते असा कंपनीने दावा केला आहे. फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक असे सिक्युरिटी फीचर्स यामध्ये मिळतात.

Spark Go 2022 ची काय असणार किंमत ?

Tecno Spark Go 2023 हा स्मार्टफोन भारतात आज लाँच झाला आहे. या फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज येते. त्या फोनची किंमत ही ६,९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन एंडलेस ब्लॅक, यूनी ब्लू आणि नेबुला पर्पल या तीन रंगांमध्ये वापरकर्ते खरेदी करू शकणार आहेत. हा स्मार्टफोन ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच या फोनवर ऑफर ग्राहकांना मिळत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 14:53 IST

संबंधित बातम्या