Tecno Camon 19 Pro Mondrian Edition: Tecno गेल्या काही आठवड्यांपासून सतत आपल्या नवीन मल्टी कलर चेंजिंग स्मार्टफोनशी संबंधित माहिती शेअर करत आहे. कंपनीने आता Tecno Camon 19 Pro Mondrian Edition च्या लॉंचच्या तारखेवर शिक्कामोर्तब केलाय. नवीन Tecno स्मार्टफोनमध्ये एक यूनिक कलर-चेंजिंग रियर पॅनल देण्यात आला आहे.
Tecno चे मागील पॅनल सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर वेगवेगळे रंग दाखवतं आणि मल्टी-कलर चेंज डिझाइनसह येणारा हा पहिला फोन आहे. याआधी Vivo ने देशात Flourite AG ग्लास असलेले स्मार्टफोन लॉंच केले आहेत. यामध्ये फोनच्या मागील पॅनलचा रंग सूर्यप्रकाशात बदलतो. Tecno ने खात्रीशीर माहिती दिली आहे की, नवीन CAMON 19 Pro Mondrian Edition येत्या १५ सप्टेंबर रोजी देशात लॉंच होईल. कंपनीने जारी केलेल्या टीझरमध्ये फोनच्या मागील बाजूस विविध रंगांचे ब्लॉक्स दिसून येतात.
आणखी वाचा : ‘या’ तारखेपासून सुरू होतोय Flipkart Big Billion Days सेल; टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनवर ८० टक्क्यांपर्यंत सूट
Tecno Camon 19 Pro Mondrian Edition specifications
Tecno Camon 19 Pro Mondrian Edition मध्ये फुलएचडी+ रिझोल्यूशन देणारा ६.८ इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट १२० Hz आहे. हा फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टम आधारित HiOS ८.६ सह येतो. सुरक्षेसाठी स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.
Tecno Camon 19 Pro Mondrian Edition मध्ये MediaTek Helio G96 चिपसेट आणि ८ GB RAM देण्यात आली आहे. फोनला चार्ज करण्यासाठी ३३ W फास्ट चार्जिंगसह ५००० mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, ५० मेगापिक्सेल पोर्ट्रेट लेन्स आणि २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर आहे.
आणखी वाचा : ५० MP कॅमेरा असलेला Vivo Y22 स्मार्टफोन भारतात दाखल, किंमत आणि सर्व फीचर्स जाणून घ्या
आणखी वाचा : 5G साठीची तगडी स्पर्धा! केवळ १५ हजारात iQOO Z6 Lite 5G ची भारतात एंट्री, जाणून घ्या फीचर्स
Tecno च्या आगामी फोनमधील स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येऊ शकते. डिव्हाईसमध्ये डीटीएस ऑडिओ स्टिरिओ स्पीकर देण्यात आले आहेत.
एका ताज्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, टेक्नोचे हे डिव्हाईस देशात २०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध केले जाऊ शकते. Tecno च्या ऑनलाइन स्टोअर व्यतिरिक्त फोन Amazon India वर देखील खरेदीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. CAMON 19, CAMON 19 Neo आणि CAMON 19 Pro 5G स्मार्टफोन CAMON 19 Pro Mondrian Edition च्या आधी देशात लॉंच केले गेले आहेत.