बार्सिलोनो येथे सुरु असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०२३ मध्ये Tecno कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या शो मध्ये अनेक मोबाईल कंपन्यांनी आपले नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. टेक्नो कंपनीने लॉन्च केलेल्या स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

बार्सिलोनोमधील या वर्षातील सर्वात मोठ्या मोबाईल शो मध्ये tecno ने आपला नवीन Tecno Phantom V Fold स्मार्टफोन लॉन्च कलेला आहे. हा कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आहे. डाव्या बाजूने उजवीकडे फोल्ड केलेला हा जगातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असल्याचा या फोनबद्दल दावा करण्यात येत आहे.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
pegasus apple advisory
iPhone वर ‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरचे संकट, खासगी डेटावर हॅकर्सची संभाव्य ‘नजर’; उपाय काय?
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली

हेही वाचा : World’s Richest Person: पुन्हा एकदा Elon Musk चं नंबर वन! जगातील श्रीमंताच्या यादीत मिळवले पहिले स्थान, गौतम अदाणी ‘या’ स्थानावर

Tecno Phantom V Fold चे फीचर्स

Tecno Phantom V Fold या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9000+ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये वापरकर्त्यांना ड्युअल सिम सपोर्ट मिळणार आहे. तसेच यामध्ये ड्युअल ५ जी प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. तसेच Tecno Phantom V Fold सह अल्ट्रा क्लीन 5 लेन्स कॅमेरा सिस्टीम देखील देण्यात आली आहे. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स असणार आहे.

Tecno Phantom V Fold या स्मार्टफोनमध्ये दोन फ्रंट कॅमेरे आहेत. या फोनच्या सर्वच फीचर्सबद्दल कंपनीने माहिती जाहीर केलेली नाही. Phantom V Fold व्यतिरिक्त, Tecno ने MWC 2023 मध्ये Tecno Spark 10 Pro हा स्मार्टफोन व MegaBook S1 लॅपटॉप देखील लॉन्च केला आहे.

हेही वाचा : MWC 2023: Xiaomi ने केली वायरलेस एआर ग्लासेसची घोषणा; ‘हे’ आहेत उपयोग, जाणून घ्या

Tecno Spark 10 Pro हा ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असलेला एक सेल्फी फोकस स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये वापरकर्त्यांना MediaTek Helio G88 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यामध्ये ड्युअल फ्लॅश लाईट आणि मागील बाजूस स्टेरी ग्लास आणि ग्लॉसी फिनिश दिले आहे. .