आपल्या कॉम्प्युटरची सुरक्षा हा आपल्या प्रत्येकासाठी महत्वाचा मुद्दा असतो. त्यासाठी आपण अँटीव्हायरस किंवा पासवर्ड ठेवणे अशा सुरक्षा प्रणालींचा वापर करतो. तरीही हॅकर्स कॉम्प्युटर हॅक करून त्यातला डेटा चोरतातच. कॉम्प्युटरमधून काही फाईल्स किंवा अन्य काही गोष्टी ट्रान्सफर करण्यासाठी आपण पेनड्राइव्हचा वापर करत असतो. मात्र हाच पेनड्राइव्ह सुद्धा आपल्या कॉम्प्युटरची सुरक्षा करू शकतो.

पेनड्राइव्हला आपण आपल्या कॉम्प्युटरचा ‘सुरक्षारक्षक’ एका सॉफ्टवेअरच्या मदतीने करू शकतो. हे सॉफ्टवेअर आहे ते सर्व विंडोजसाठी मोफत उपलब्ध असणार आहे. ते सॉफ्टवेअर डाउनलोड करत असताना मात्र त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स नक्की वाचून घ्याव्यात. USB फ्लॅश ड्राइव्ह निवडावा आणि अल्टरनेट पासवर्ड ठेवावा म्हणजे पेनड्राईव्ह हरवल्यास त्याचा वापर तुम्हाला करता येईल. प्रोटेक्शन की म्हणून पेनड्राईव्ह वापरता आला हा जसा फायदा आहे. तसेच कॉम्प्युटरवर काम करत असताना हे बंद करता येत नही. हे शट डाऊन करताना युजर्स आपल्या महत्वाच्या फाईल्स गमवू शकतात. तुम्ही पेनड्राइव्ह काढून लॉक करू शकता. आवश्यक असल्यास, आपण लॅपटॉप चालू करून त्वरीत अनलॉक करू शकता, ज्यामुळे तुमचा बराच वेळ वाचू शकेल.

multi asset portfolio, investment, shares, stocks, mutual fund, commodity market, gold, expensive paintings, crypto currency, finance article
मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
diy weight loss mantra work weight loss formula 3 8 3 benefits explained No food 3 hours before bedtime sleep for 8 hours and no solid food 3 hours after waking
वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नाही; फॉलो करा एक्सपर्टचा ३-८-३ फॉर्म्युला; वजन झटपट होईल कमी
Perfect 7 Times To Drink Water In 24 Hours
दिवसभरात पाणी पिण्यासाठी ‘या’ ७ वेळा आहेत परफेक्ट! २४ तासांत कधी पाणी प्यावं? वाचा फायदे

हेही वाचा : Consumer Electronic Show 2023: सर्वात मोठ्या टेक इव्हेन्टमध्ये सॅमसंग करणार ‘हे’ चार नवीन मॉनिटर्स लाँच

आता जाणून घेऊयात सॉफ्टवेअरविषयी

Rohos Logon Key हे या सॉफ्टवेअरचे नाव आहे. हे सर्व विंडोज युजर्ससाठी फ्री असून गुगल क्रोमवर जाऊन हे डाउनलोड करता येईल.

कसे डाउनलोड करावे.

१. सर्व प्रथम, पासवर्ड व्यतिरिक्त पेनड्राईव्हच्या माध्यमातून कॉम्प्युटर अनलॉक करण्यासाठी Rohos Logon Key हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा.
२. यावर डबल क्लिक केले असता तुम्हाला पासवर्ड कसा लावायचे याचे खूप ऑप्शन्स दिसतील. यामधील केवळ पेनड्राइव्ह हा ऑप्शन सिलेक्ट करा.
३. त्यानंतर setup authentication key वर क्लिक करून सेटिंग आयकॉनवर क्लिक करा. पुढे USB Flash Drive ला सिलेक्ट करा.
४. यानंतर पासवर्ड टाकल्यावर Set Up the Key वर क्लिक करा. त्यानंतर पेनड्राईव्ह तुमच्या कॉम्प्युटरचा ‘सुरक्षारक्षक’ तयार होईल.