scorecardresearch

Apple ची नवीन सिरीज लवकरच बाजारात, किंमत असणार पूर्वीपेक्षा कमी; जाणून घ्या

Apple iPhone 15 and iPhone 15 Plus: प्रत्येकाची इच्छा असते की ,एकदातरी Apple कंपनीचे मोबाईल वापरावेत.

Apple ची नवीन सिरीज लवकरच बाजारात, किंमत असणार पूर्वीपेक्षा कमी; जाणून घ्या
Image courtesy – The Indian Express

प्रत्येकजण आजच्या काळात अत्याधुनिक मोबाईल डिव्हाईस वापरत असतो. पण प्रत्येकाची इच्छा असते की ,एकदातरी Apple कंपनीचे मोबाईल वापरावेत. आता या Apple iPhone १५ ही सिरीज कधी लाँच होणार हे अजून निश्चित नाही. कारण या आयफोनमधील फीचर्स आणि इतर सुविधांवर कंपनी विचार करत आहे. मात्र iPhone 15 आणि iPhone 15 Plus यांची किंमत आधीच्या म्हणजेच iPhone 14 आणि iPhone 14 Plus पेक्षा कमी असू शकते असा अंदाज आहे.

क्यूपर्टिनो-आधारित कंपनी पुढील प्लस आयफोन यशस्वी करण्यासाठी दोन स्ट्रॅटेजीचा वापर करत आहे. दिलेल्या अहवालानुसार प्रो आणि नॉन-प्रो मॉडेलमधील फीचर वाढवण्यासाठी हा पर्याय असू शकतो. Apple ने आयफोन 15 प्लसची निवड करण्यासाठी ग्राहकांना आकर्षित करू इच्छित आहे.

हेही वाचा : Consumer Electronic Show 2023: सर्वात मोठ्या टेक इव्हेन्टमध्ये सॅमसंग करणार ‘हे’ चार नवीन मॉनिटर्स लाँच

कंपनीची दुसरी स्ट्रॅटेजी ही आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस अधिक स्वस्त करणे असेल. आता बाजारात उपलब्ध असलेल्या आयफोन १४ ची किंमत ८९,९०० असून त्यात १२८ जीबी स्टोरेज येते. त्याचप्रमाणे आयफोन १४ ची सुरुवातीची किंमत ही ७९,९०० इतकी आहे. यापुढचे मॉडेल या दोन्हीपेक्षा स्वस्त असण्याचा अंदाज आहे.

2023 च्या आयफोन लाइनअपमध्ये iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि सर्व-नवीन iPhone 15 अल्ट्रा समाविष्ट असल्याची एक अफवा आहे. नेहमीप्रमाणेच सप्टेंबर महिन्यात स्मार्टफोन्सचे लाँच होण्याची अपेक्षा आहे. Apple ने iPhone 15 सिरीजमध्ये यूएसबी टाईप -सी चार्जिंग पोर्ट देखील ऑफर केल्याचे सांगितले जात आहे. ४०जीबी पर्यंत डेटा ट्रान्सफरसाठी यूएसबी ३.२ अशीही सुविधा शक्यता आहे. या सिरीजमध्ये हाय-एन्ड स्मार्टफोन्समध्ये A17 प्रोसेसर असू शकतो. यामध्ये ८ जीबी रॅम मिळू शकते. कंपनी डायनॅमिक आयलंड स्क्रीनचे फिचर देऊ शकते. ज्यात आयफोन १५ सिरीज मॉडेल्समध्ये आयफोन १४ पेक्षा स्वस्त असू शकतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 12:34 IST

संबंधित बातम्या