Mobile Simcard News: आपण प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो. त्याशिवाय आपली कामे किंवा दिवसच पुढे जात नाही. स्मार्टफोन ही आज प्रत्येकाची गरज बनलेला आहे. पण या स्मार्टफोनमधून कोणाला संपर्क करायचा असेल किंवा इंटरनेट वापरायचे असेल तर त्याला गरज असते ती सिम कार्डची . भारतात अशा अनेक कंपन्यात आहेत ज्यांचे सिमकार्ड आपण वापरतो. जी कंपनी चांगल्यातील चांगला प्लॅन देईल त्याचे सिम कार्ड आपण वापरतो.

पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या सिमकार्डमध्ये सोने असते. होय हे खरे आहे तुमच्या फोनमध्ये असणारे सिमकार्ड तयार करण्यासाठी सोन्याचा वापर केला जातो. सिमकार्डवर सोन्याचा थर असतो. पण आपले सिमकार्ड खराब होते तेव्हा हे सोने पण खराब होते का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? हे सोने पुन्हा वापरण्याऐवजी ई-वेस्ट लँडफिलमध्ये त्याचे रूपांतर करण्यात आले. त्यामागचे कारण असे आहे की, सिमकार्डमधून सोने वेगळे करण्यासाठी अजून कोणतीही उपाययोजना तयार झालेली नाही.

हेही वाचा : Amazon Republic Day Sale: ‘या’ उपकरणांवर मिळतेय ‘इतकी’ सूट; जाणून घ्या

एक डिजिटल ट्रेंडच्या अहवालानुसार सिमकार्डमधून सोने वजले करण्यासाठी प्रचंड प्रमाणात खर्च येत असल्याचे म्हणणे तज्ज्ञांचे आहे. मात्र अत इंपिरिअल कॉलेज लंडन यांनी सिमकार्डमधून सोने वेगळे काढण्याची पद्धत तयार केली आहे. सिमकार्डवर सोन्याचा थर असतो कारण सोने हे विजेचे उत्कृष्ट वाहक असून, तसेच चांदी आणि इतर धातूंच्या तुलनेत सोने खराब होत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिमकार्डमधून समजा सोने काढलेच तर त्याचा पुनर्वापर होऊ शकत नाही. त्यापेक्षा सिमकार्डच्या ई-कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोपे असते. समजा सिमकार्डमधून सोने काढलेच तर , खाणीतून सोने काढल्यावर होणारे पर्यावरणाचे नुकसान कमी होण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते.