ऑनालाई फसवणूक आणि डेटा चोरीचे प्रकार खूप वाढले आहेत. ऑनालइन भामटे तुमच्या क्रेडिट, डेबिट कार्डची माहिती चोरण्यासाटी अ‍ॅपद्वारे मालव्हेअरचा वापर करत असल्याचेही समोर आले होते. त्यामुळे, खासगी डेटा सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. सुरक्षित ठिकाणांवरूनच अ‍ॅप डाऊनलोड केले पाहिजे. दरम्यान, गुगल प्ले स्टोअर हे अँड्रॉइड अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी सुरक्षित मानले जाते, मात्र तेथे देखील काही डेटा चोरणारे हानीकारक अ‍ॅप आढळले आहेत.

मालव्हेअरबाइट लॅबच्या सुरक्षा तज्ज्ञांनी ४ अ‍ॅप्सबाबत सावधान केले. हे अ‍ॅप्स युजरचा खासगी डेटा चोरत असल्याचे त्यांना लक्षात आले आहे. हे अ‍ॅप्स लवकर मोबाईलमधून काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

(Twitter blue : सध्या ‘या’ 5 देशांमध्ये ट्विटर ब्ल्यू सेवा सुरू, भारतात कधी सुरू होणार? मस्क म्हणाले..)

अ‍ॅपमध्ये अँड्रॉइड ट्रोजन

मालव्हेअरबाइट लॅबच्या सुरक्षा तज्ज्ञांनी ४ अँड्रॉइड अ‍ॅप्सविषयी माहिती दिली आहे, जे गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध होते. प्लेस्टोअरच्या सहायाने हे अ‍ॅप अँड्रॉइड ट्रोजन वितरीत करत होते. या चारही अ‍ॅपमध्ये Android/Trojan.HiddenAds.BTGTHB ट्रोजन होते. हे अ‍ॅप लाखोवेळा डाऊनलोड करण्यात आले आहेत आणि मोबाइल अ‍ॅप्स ग्रुप या कंपनीद्वारे बनवण्यात आले आहेत.

‘हे’ आहेत ते चार अ‍ॅप्स

१) ब्ल्युटूथ ऑडिओ कनेक्ट
२) ड्रायव्हर : ब्ल्युटूथ, वायफाय, यूएसबी
३) ब्ल्युटूथ अ‍ॅप सेंडर
४) मोबाइल ट्रान्सफर : स्मार्ट स्विच

काय करत होते हे अ‍ॅप्स

सुरक्षा तज्ज्ञांनी आपल्या अहवालात सांगितले की, अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर दोन आवड्यांनी हे अ‍ॅप मलेशियस वर्तनूक करायचे आणि गुगल क्रोम किंवा मोबाइल ब्राउजर्समध्ये फिशिंग संकेतस्थळ उघडायचे. युजरला सुगावा न लागता ही संकेतस्थळे पे पर क्लिकनुसार कमाई करत होती. डिव्हाइस लॉक असल्यानंतरही क्रोम टॅब बॅकग्राउंडमध्ये ओपन असायचे आणि अ‍ॅप आयकन टॅप करताच दिसायचे.

(Samsung vs apple : पण त्यांच्याकडे असा फोन नाही.. सॅमसंगने जाहिरातीतून केले अ‍ॅपलला ट्रोल, पाहा हा व्हिडिओ)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालव्हेअर असलेले अ‍ॅप्स लपूनछपून जाहिरात दाखवत होते आणि युजरला त्यावर टॅप करवून घेत होते. जाहिराती दाखवण्यासाठी युजरच्या डेटाचा वापर होत होता. हा डेटा आधी घेतलेल्या परवानग्यांच्या मदतीने गोळा केला जात होता.