Budget friendly smartphone : उत्तम कॅमेरा, भरपूर वेळ चालणारी बॅटरी आणि सुंदर दिसणारा असा स्मार्टफोन घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, कधी कधी अशा उत्तम क्वालिटीच्या स्मार्टफोनची किंमत खूपच जास्त असते. असे असले तरीही सध्या बाजारामध्ये विविध कंपन्यांचे उत्तमोत्तम स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. इतकेच नाही, तर ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारेही आहेत. मार्च महिन्याच्या ५ तारखेला Nothing Phone 2a चे लाँच झाले होते. हा स्मार्टफोनदेखील अत्यंत सुंदर आणि खिशाला परवडणाऱ्या स्मार्टफोन्सच्या यादीत येतो.

मात्र, ५० हजार रुपयांच्या आत मिळणाऱ्या इतर स्मार्टफोन्सबद्दल माहिती पाहा. त्यामध्ये आपण iQOO Neo, OnePlus व Nothing Phone या कंपन्यांच्या फोन्सची किंमत तसेच त्यांची खासियत पाहणार आहोत.

thane air quality marathi news, thane air quality index marathi news,
ठाण्याची हवा समाधानकारक, हवेचा गुणवत्ता निर्देशांक ६५ ते ८५ च्या आत
sharad pawar
पवारांच्या कोंडीसाठी मुंबई बाजारसमिती लक्ष्य?
Gold Silver Price on 7 April
Gold-Silver Price on 7 April 2024: ग्राहकांना दिलासा नाहीच! सोने पुन्हा एकदा महागले, चांदीच्या दरातही ‘एवढ्या’ रुपयांची वाढ
nitin gadkari
चावडी: मी प्रचार (नाही) करणार!

हेही वाचा : ग्राहकांनो ‘इतक्या’ हजारांना मिळतोय ‘Nothing Phone 2a’! पाहा नवीन लाँच झालेल्या फोनचे भन्नाट फीचर

५० हजारांपेक्षा कमी किमतीचे स्मार्टफोन [Smartphone under 50K]

१. iQOO Neo 9 Pro 5G

यामध्ये आपण सर्वांत पहिल्यांदा iQOO Neo 9 Pro 5G या फोनची माहिती पाहणार आहोत
या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ जेन २ [Snapdragon 8 Gen 2 ] हा प्रोसेसर आहे.
या स्मार्टफोनमध्ये १२०Hz रिफ्रेश रेट असलेला सुंदर अमोल्ड [AMOLED] फ्लॅट डिस्प्ले बसविण्यात आला आहे.
तसेच यात ५० मेगापिक्सेल IMX920 प्रायमरी रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरीबद्दल सांगायचे, तर यामध्ये भरपूर वेळ काम करणारी ५,१६०mAh बॅटरी बसविलेली आहे. या iQOO Neo 9 Pro 5G स्मार्टफोनची किंमत ३६,९९९ रुपये इतकी आहे.

२. OnePlus 12R 5G

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर OnePlus 12R 5G हा स्मार्टफोन येतो. सध्या हा स्मार्टफोन लोकप्रिय आहे. या स्मार्टफोनमध्ये १२०Hz रिफ्रेश रेट असलेला अमोल्ड [AMOLED] डिस्प्ले बसविलेला आहे. स्क्रीनवरील सर्व गोष्टी स्पष्ट दिसण्यासाठी यामध्ये ४,६००nits ब्राईटनेस दिलेला आहे. हा स्मार्टफोन ओल्या हातांनीदेखील अगदी सहज वापरता येऊ शकतो. त्यासाठी यामध्ये अॅक्वा टच हे तंत्रज्ञान वापरलेले आहे. दिवसभर काम करण्यासाठी या फोनमध्ये ५,५००mAh बॅटरी दिलेली आहे. या OnePlus 12R 5G स्मार्टफोनची किंमत ३९,९९९ रुपये इतकी आहे.

हेही वाचा : आता Instagramच्या ‘हिडन’ फीचरमध्ये खेळता येईल भन्नाट गेम! स्टेप्स बघा, खेळून पाहा…

३. Nothing Phone (2)

Nothing कंपनीने नुकतेच Nothing Phone 2 a हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. मात्र, इथे आपण Nothing Phone (2)बद्दल माहिती पाहणार आहोत.
या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८+ जेन १ [Snapdragon 8+ Gen 1] हा प्रोसेसर आणि OS सॉफ्टवेअर बसविले गेले आहे. तसेच ५० मेगापिक्सेल ड्युअल-रिअर कॅमेरा दिलेला आहे.
तुम्हाला Nothing Phone (2) या स्मार्टफोनचा १२८GB व्हेरियंट स्मार्टफोन ३९,९९९ रुपयांना मिळेल.