Hidden game feature of Instagram : व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम या माध्यमांचा वापर वापरकर्त्यांसाठी अधिक सुरळीत करण्यासाठी मेटा ही कंपनी आपल्या ॲप्समध्ये सातत्याने विविध अपडेट्स आणि फीचर्स घेऊन येत असते. कधी ते अपडेट्स ॲप्सची सुरक्षा वाढवण्याचे काम करत असतात, तर कधीकधी काही ‘हिडन’ फीचरमुळे वापरकर्त्यांना मजेशीर गोष्टींचा वापर करण्यास मिळत असतो.
अशाच एका इन्स्टाग्रामच्या हिडन फीचरबद्दल इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्या फीचरच्या मदतीने आता हे ॲप वापरणारी व्यक्ती चॅट करताना एक भन्नाट असा गेम खेळू शकते; असे व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून समोर आलेले आहे. मात्र, आता हा गेम नेमका कुठे शोधायचा, कसा खेळायचा आणि हे हिडन फीचर कसे शोधायचे हे आपण पाहू.
हेही वाचा : आता WhatsApp वरून इतर अॅप्सवर पाठविता येतील मेसेज? ‘या’ फीचरबद्दल अधिक माहिती पाहा…
इन्स्टाग्रामवरील beebomco नावाच्या अकाउंटने या फीचरबद्दल माहिती देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार आपण इन्स्टाग्रामवर गेम कसा खेळायचा त्याच्या स्टेप्स पाहू.
इन्स्टाग्रामवरील गेमिंगचे हिडन फीचर वापरण्याच्या स्टेप्स :
- सर्वप्रथम इन्स्टाग्राम ॲप सुरू करावे
- आता कुणाच्याही किंवा स्वतःच्या चॅटबॉक्समध्ये जावे.
- आता आपण एखाद्याला जसे इमोजी/स्मायली पाठवतो, त्याप्रमाणे कोणताही एक इमोजी सेंड करावा.
- आता सेंड केलेल्या इमोजीवर क्लिक करा.
- तुमचा पॉंग हा गेम सुरू होईल.
- या खेळात स्क्रीनवर तुम्ही पाठवलेला इमोजी एखाद्या चेंडूप्रमाणे फिरेल. तो जसा खाली येऊ लागेल तसे तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या काळ्या रंगाच्या बोर्डने झेलायचा आहे.
- हा खेळ खेळताना तुमचा झालेला स्कोअर फोनच्या उजव्या कोपऱ्यात दिसत राहील.
- तसेच तुम्ही खेळातून आऊट म्हणजेच बाद झाल्यानंतर, तुमचा हायस्कोरदेखील सेव्ह राहणार आहे.
हेही वाचा : इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट न होऊ देता Threads प्रोफाइल कसे कराल बंद? या स्टेप्स पाहा….
त्यामुळे आता इन्स्टाग्राम हे फक्त रिल्स पाहण्यासाठी किंवा फोटो, स्टोरी अपलोड करण्यासाठी नाही, तर गेम खेळण्यासाठीदेखील वापरता येणार आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर या हिडन फीचरची सगळीकडे चर्चा होऊ लागली आहे. अनेक नेटकऱ्यांनी या स्टेप्सचा वापर करून गेम खेळूनदेखील पाहिला आहे. काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया पाहा.
“बापरे.. इमोजीमध्ये गेम लपवून ठेवला होता!! अजून कुठे आणि काय लपवलं असेल काय माहीत”, असे एकाने म्हटले आहे. “चांगलं आहे.. आता रिप्लायची वाट बघेपर्यंत काहीतरी करता येईल”, अशी मिश्कील प्रतिक्रिया दुसऱ्याने दिली आहे. “तुमचा स्कोर किती झाला आहे?” असा तिसऱ्याने प्रश्न केल्यावर, चौथ्याने, “२४” असे उत्तर दिले आहे. मात्र, त्याखाली अजून काहींनी, “२७”, “५४”, “७७” असे लिहिलेले आहे.
तुम्हालादेखील हे फीचर नवीन असेल तर या स्टेप्स वापरून एकदा प्रयोग नक्की करून पाहा. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर शेअर झालेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत ४.१ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.