Tinder Update: टिंडरने अलीकडेच आपले डेस्क मोड फीचर अपडेट करून वापरकर्त्यांसाठी खुशखबर आणली आहे. या नव्या अपडेटनुसार आता कामाच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वर अगदी बॉसच्या समोर बसूनही न पकडले जाता बिनधास्त स्वाईप करता येणार आहे. अलीकडेच टिंडरच्या एका सर्वेक्षणात असे समोर आले की, डेटिंग ऍप वापरणारे ४७ टक्के वापरकर्ते हे कामावर असताना ऍप वापरतात, त्यातही विशेष म्हणजेच टिंडरच्या एकूण वापरकर्त्यांच्या एक तृतीयांश टक्के युजर्स चक्क मीटिंग मध्ये असताना स्वाईप करत असतात. बहुतांश राईट स्वाईप, मॅच आणि चॅटिंग हे मीटिंग किंवा कामाच्या वेळेत केलेले असतात. या सर्वांसाठी टिंडर काय खास फीचर घेऊन आले आहे, पाहुयात..

कामावर असताना चुकूनही कधी तुमच्या बॉस किंवा कर्मचाऱ्याला तुम्ही डेटिंग ऍप वर किती वेळ घालवता हे कळू नये यासाठी टिंडरने यासाठी एक अत्यंत मजेदार आणि बुद्धिमान उपाय आणला आहे. अॅपच्या वरच्या डाव्या कोपर्‍यात एक बॅगेचा आयकॉन आहे जो तुम्ही क्लिक करताच “मीटिंग नोट्स” नावाचा बनावट अहवाल दिसतो. हा रिपोर्ट व्यावसायिक दिसत असला तरी, तो वाचल्यावर तुम्हला कळेल की यात खरंतर तुम्ही चॅट लपवण्यासाठी मजेशीर माहिती लिहिली आहे.

डेटींग अ‍ॅप वर तो रक्षाबंधनासाठी शोधतोय बहीण; Tinder वरील ‘तो’ अवलिया चर्चेत

टिंडरच्या प्रवक्त्याने फॉर्च्यूनला दिलेल्या माहितीनुसार, टिंडरने २०१७ मध्ये पहिल्यांदा ‘डेस्क मोड’ लाँच केल्यावर, ब्रीफकेस आयकॉनला महिनाभरात १ मिलियन वेळा क्लिक केले गेले होते. कोरोना काळात सुद्धा म्हणजेच २०२१ मध्ये या मोड वर साडे आठ लाखाहून अधिक क्लिक आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वेळी, नॅशनल इंटर्न डे च्या हे डेस्क मोड फीचर पुन्हा एकदा अपडेट करण्यात आले आहे. मल्टिटास्किंगची हौस असलेल्यांनी विनाकारण कुठे अडकू नये व बॉसचा ओरडा बसू नये म्हणून टिंडरने हे खास सरप्राईझ वापरकर्त्यांना दिले आहे. तुम्हाला ही नवी कल्पना कशी वाटतेय हे नक्की कळवा.