देशातील Apple चे दुसरे रिटेल स्टोअर दिल्लीमधील साकेत येथे सुरु करण्यात आले आहे. सीईओ टीम कूक यांनी या स्टोअरचे उदघाट्न केले आहे. याआधी परवा टीम कुक यांनी मुंबई येथे Apple च्या पहिल्या रिटेल स्टोअरचे उद्घाटन केले. यावेळी टीम यांनी हात जोडून लोकांचे स्वागत केले होते. दिल्लीमध्ये उभारण्यात आलेले हे रिटेल स्टोअर सिटीवॉक मॉल इथे उभारण्यात आले आहे. हे स्टोअर १०,००० ते १२,००० स्क्वेअरफूटमध्ये उभारले आहे. आज सकाळी १० वाजल्यानंतर ग्राहक या स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करू शकणार आहेत. या स्टोअरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Apple चे देशातील दूर रिटेल स्टोअर हे दक्षिण दिल्लीमधील सिलेक्ट सिटी वॉक मॉलमध्ये तयार करण्यात आले आहे. मॉलमधील पहिल्या मजल्यावर असणारे हे स्टोअर मुंबईतील फ्लॅगशिप स्टोअरपेक्षा खूपच लहान आहे. मात्र येथे ग्राहकांना Apple ची सर्व प्रॉडक्ट्स बघायला मिळणार आहेत. Apple च्या भारतातील दुसऱ्या रिटेल स्टोअरविषयी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.

हेही वाचा : Apple First Retail Store Opening: मुंबईत सुरू झालेल्या देशातील पहिल्या अ‍ॅपल स्टोअरबद्दल जाणून घ्या ‘या’ १० प्रमुख गोष्टी

१.

Apple चे हे दुसरे स्टोअर दिल्लीमधील सिलेक्ट सिटी सिटीवॉक मॉलमध्ये पहिल्या मजल्यावर उभारण्यात आले आहे. Apple साकेटमध्ये विशिष्ट प्रकारचे डिझाईनने तयार केलेले स्टोरफ्रंट आहे. Apple च्या प्रॉडक्ट्स आणि उपकरणे अधिक चांगल्या पद्धतीने दिसावीत म्हणून व्हाईट ओक टेबल्सचा वापर करण्यात आला आहे.

२.

दिल्लीमधील Apple च्या या दुसऱ्या रिटेल स्टोअरमध्ये ७० कर्मचारी काम करणार आहेत. तसेच ते खरेदीदारांशी १ , २ नव्हे तर तब्बल १५ भाषांमध्ये संवाद साधणार आहेत. तसेच Apple साकेतची फिचर वॉलदेखील भारतामध्येच तयार करण्यात आली आहे.

३.

हे स्टोअर तयार करत असताना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची खास काळजी घेण्यात आली आहे. कारण हे स्टोअर पूर्णपणे स्टोअर पूर्णपणे कारबन न्यूट्रल स्वरूपाचे आहे.

हेही वाचा : देशातील दुसरे Apple चे रिटेल स्टोअर ‘या’ शहरात होणार सुरू; ७० सदस्यांची टीम १५ भाषांमध्ये संवाद साधणार

४.

Apple साकेत स्टोअरमध्ये भारतीय ग्राहक कंपनीच्या AI सेवा ‘Apple Genius’ शी संवाद साधता येणार आहे. ही सुविधा परदेशात Apple स्टोअरमध्ये ऑफर केलेल्या सुविधांसारखीच आहे. Apple च्या जिनियसमधून ग्राहकांना कंपनीच्या कोणत्याही उत्पादनाची माहिती मिळणार आहे.

५.

दिल्ली साकेतमधील हे Apple स्टोअर सकाळी १० वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या वेळेत ग्राहक कधीही जाऊन त्यांच्या आवडीचे प्रॉडक्ट खरेदी करू शकणार आहेत. तसेच स्टोअर शुक्रवार ते बुधवार सुरु राहणार असून गुरुवारी ते बंद असणार आहे.

६.

या स्टोअरमधून ग्राहकांना आयफोन, मॅक आणि आयपॅडसह अनेक प्रॉडक्ट्स खरेदी करता येणार आहेत. खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे खरेदी केल्यावर तुम्हाला Apple गिफ्ट कार्ड मिळणार आहे.

हेही वाचा : VIDEO: दिल्ली येथे देशातील Apple चे दुसरे स्टोअर झाले सुरु; CEO टीम कुक यांनी हात जोडत केले ग्राहकांचे स्वागत

७.

Apple साकेत स्टोअर हे रणा आणि शिक्षणाचे एक रोमांचक केंद्र असेल. जे ग्राहकांना ‘Today At Apple’ द्वारे विनामूल्य काही मोफत सेशन्स ऑफर करणार आहे.

८.

तुम्हाला कोणत्याही प्रकारचे Apple प्रॉडक्ट खरेदी करताना त्याबद्दल काही शंका असल्यास तिथे असलेली एक्सपर्ट टीम तुम्हाला मदत करणार आहे. जोवर तुमच्या समस्यांचे, शंकांचे निराकरण होणार नाही तोवर ही टीम तुम्हाला मदत करणार आहे.

९.

Apple साकेतमध्ये ग्राहक नवीन आयफोन्स आणि कंपनीची बाकी प्रॉडक्ट्स खरेदी करू शकतात. तसेच खरेदीदार त्यांचे जुने आयफोन, मॅक, आयपॅड असे नवीन प्रॉडक्ट्स खरेदी करण्यासाठी एक्सचेंज ऑफर मिळणार आहे.

१०.

दक्षिण दिल्लीमधील सिलेक्ट सिटी वॉक मॉलमधील पहिल्या मजल्यावर असणारे हे स्टोअर मुंबईतील फ्लॅगशिप स्टोअरपेक्षा खूपच लहान आहे. मात्र येथे ग्राहकांना Apple ची सर्व प्रॉडक्ट्स बघायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top 10 things about india apple second retail store ceo tim cook delhi saket citi walk mall tmb 01
First published on: 20-04-2023 at 17:29 IST