आज भारतामध्ये Apple चे पहिले रिटेल स्टोअर उभे राहणार आहे. अ‍ॅपलचे भारतातील पहिले स्टोअर जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉल मुंबईत सुरू होणार आहे. आज त्याचे उदघाटन होणार आहे. Apple चे CEO टिम कुक यांच्या हस्ते Apple च्या देशातील पहिल्या रिटेल स्टोअरचे उद्घाटन आज सकाळी ११ वाजता होणार आहे. मुंबईच्या अ‍ॅपल स्टोअरच्या भिंतींवर मुंबईच्या काळी -पिवळी टॅक्सी कलेतून प्रेरित पेंटिंग्ज साकारण्यात येणार आहेत. याशिवाय अ‍ॅपल बीकेसी क्रिएटिव्हमध्ये अ‍ॅपलची अनेक उत्पादने आणि सेवा देखील कोरल्या जातील. स्टोअरचे क्रिएटिव्ह “हॅलो मुंबई” या क्लासिक अ‍ॅपल टॅगलाइनअंतर्गत तुमचे स्वागत करण्यात येणार आहे.

भारतामध्ये सध्या Apple चे फक्त ऑनलाईन स्टोअर उपलब्ध आहे. इतर स्टोअर्स हे कंपनीचे अधिकृत स्टोअर्स आहेत. Apple चे मुंबईतील स्टोअर रिलायन्स इंडस्ट्रीच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उभारण्यात येणार आहे. हे स्टोअर या मॉलमध्ये २२ हजार स्केअरफूटमध्ये उभे राहणार आहे. मुंबईचे स्टोअरही न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूरसारख्या अ‍ॅपलच्या स्टोअरसारखेच असणार आहे. याबाबतचे वृत्त Economic Times या वृत्तसंस्थेने दिले आहे.

What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
Antarctica Post Office
भारतीय टपाल विभागाने रचला इतिहास; अंटार्क्टिकामध्ये सुरु केले नवे पोस्ट ऑफिस
first Indian woman who joined Unicorn Club
‘अब्ज डॉलर’ कंपनी चालवणारी ‘ही’ भारतीय महिला Unicorn Club मध्ये झाली सामील! कोण आहे जाणून घ्या
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती

हेही वाचा : Apple Store: २० एप्रिलला दिल्लीमधील ‘या’ मॉलमध्ये उघडणार अ‍ॅपलचे स्टोअर, जाणून घ्या कधीपासून करता येणार खरेदी

Apple रिटेल स्टोअरच्या उदघाटनाच्या आधी सीईओ टिक कूक यांनी अभिनेत्री दीक्षित, रविना टंडन आणि ए. आर रेहमान सह बॉलीवूड सेलिब्रिटींनाही भेट घेतली.

हेही वाचा : ‘Hello Mumbai’ टॅगलाइनअंतर्गत देशात उभे राहणार Appleचे पहिले स्टोअर, फोटो आले समोर

Apple चे भारतातील दुसरे फ्लॅगशिप स्टोअर राजधानी दिल्ली येथे उभारण्यात येणार आहे हे स्टोअर सिटीवॉक मॉल इथे उभरले जणार आहे. ही स्टोअर १०,००० ते १२,००० स्क्वेअरफूटमध्ये उभारले जाणार आहे. या स्टोअरचे लॉन्चिंग २० एप्रिल रोजी होणार आहे. २० एप्रिल पासून ग्राहक सकाळी १० वाजल्यानंतर या स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करू शकणार आहेत. म्हणजेच Apple चे प्रॉडक्ट घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा थर्ड पार्टी स्टोअरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही.