तंत्रज्ञानामुळे आयुष्य अगदीच सोपे झाले आहे. विविध उपकरणे आणि गॅजेट्सच्या मदतीने दिवसभरातील काही कामे काही मिनिटांत करणे शक्य झाले आहे. उदाहरणार्थ- जेवण गरम करण्यासाठी ओव्हन; तर कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन. बाजारात विविध फीचर्सच्या वॉशिंग मशीन उपलब्ध आहेत. वॉशिंग मशीन कपडे अगदी स्वछ धुऊन देते. पण, दररोज तुमचे कपडे स्वच्छ करणाऱ्या वॉशिंग मशीन तुम्ही स्वच्छ करता का ? नाही, तर आज आपण टॉप लोड, फ्रंट लोड वॉशिंग मशीन स्वच्छ करण्याच्या काही सोप्या स्टेप्स पाहणार आहोत.

वॉशिंग मशीन स्वच्छ करण्याच्या सोप्या स्टेप्स पुढीलप्रमाणे :

१. जर तुमच्याकडे वॉशिंग मशीन स्वच्छ करण्यासाठी लिक्विड असेल, तर तुमच्या वॉशर डिटर्जेंट डिस्पेंसरमध्ये ते लिक्विड घाला. हे लिक्विड किती प्रमाणात घालायचे हे त्या बाटली किंवा पॅकेटवर नमूद केलेले असते.
२. कमीत कमी ६० मिनिटे तुमची वॉशिंग मशीन चालू राहील अशा रीतीने मशीन सेट करा; वॉशिंग मशीनच्या टबमध्ये जो कचरा साचला आहे, तो काढून टाकण्यासाठी पाण्याची पातळी निश्चित करा.
३. तुमचे वॉशिंग मशीन रिकामी आहे आणि त्यात कोणतेही अतिरिक्त डिटर्जंट किंवा कोणतीही वस्तू नाही ना याची खात्री करून घ्या.
४. स्टार्ट बटणावर क्लिक करताच मशीन स्वच्छ होण्याची प्रक्रिया चालू होईल. अशा प्रकारे तुमची वॉशिंग मशीन स्वच्छ होईल.

हेही वाचा…रिलायन्स जिओ ‘या’ कंपनीबरोबर करणार पार्टनरशिप! ५जी इनोव्हेशन लॅबची होणार स्थापना

वॉशिंग मशीन किती वेळा स्वच्छ करावी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वॉशिंग मशीनचा टब वर्षातून कमीत कमी तीन वेळा स्वच्छ करून घेणे आवश्यक आहे. तसेच हे तुमच्या वॉशिंग मशीनच्या वापरावर अवलंबून आहे. जर तुम्ही बोअरिंगच्या पाण्याचा वापर करीत असाल, तर ते पाणी काही निवडक मशीनमध्ये उपलब्ध असलेल्या जाळीतून गाळून घ्या. त्यामुळे तुमच्या मशीनमध्ये कचरा जाण्याची शक्यता कमी असते.