Uber ही एक जागतिक राईड-शेअरिंग कंपनी आहे. उबेर कंपनीने देखील आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने हा निर्णय बुधवारी घेतला आहे.  उबर कंपनी आपल्या Recruiting टीममधील २०० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. वर्षभरामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या समान राहण्यासाठी कंपनीने कपातीचे पाऊल उचलले आहे. तसेच या वर्षाच्या सुरूवातीला देखील कंपनीने आपल्या माल वाहतूक सेवा विभागातील १५० कर्मचाऱ्यांची कपात केली होती. उबर कंपनीमध्ये सध्या ३२,७०० कर्मचारी कार्यरत आहेत. आता करण्यात आलेली कर्मचारी कपात ही जागतिक कर्मचाऱ्यांच्या संख्येत १ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

Wall Street Journal च्या म्हणण्यानुसार, उबरने केलेली कपात Recruiting टीमच्या एकूण ३५ टक्के इतकी आहे. ही कपात कर्मचाऱ्यांची संख्या समान राखण्यासाठी तसेच खर्चाची कार्यक्षमता सुधारण्यासाठी करण्यात आली. उबेर कंपनीने यापूर्वी २०२० च्या मध्यात साथीच्या रोगाच्या सुरूवातीला आपल्या १७ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली होती.

हेही वाचा : फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन शोधताय? ‘हे’ आहेत २०० मेगापिक्सलचा कॅमेरा असणारे बेस्ट मोबाईल, संपूर्ण यादी पहाच

उबरचा प्रमुख प्रतिस्पर्धी Lyft च्या तुलनेमध्ये उबरने लिकडच्या काही महिन्यांत लहान प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. नवीन सीईओ डेव्हिड रिशर यांच्या नेतृत्वाखाली Lyft ने एप्रिल महिन्यामध्ये आपल्या अनेक कर्मचाऱ्यांची कपात केली. ज्यामध्ये एकूण कर्मचाऱ्यांपैकी अंदाजे २६ टक्के कपात झाली. याशिवाय कंपनीने गेल्या वर्षी सुमारे ७०० कर्मचाऱ्यांची कपात केली होती. नफ्याचे (Profit) चे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांमध्ये आणि मोठा प्रतिस्पर्धी असलेल्या उबरच्या तुलनेत बाजारपेठेमधील आपले स्थान मजबूत करण्यासाठी Lyft कडून हे उपाय करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी टेक क्षेत्रामध्ये देखील अनेक दिग्गज कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये Amazon, Google , Meta आणि मायक्रोसॉफ्ट यासारख्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे. काही कंपन्यांनी तर दोन वेळेस कपात केली आहे. जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत ही कर्मचारी कपात करण्यात येत आहे. सोशल प्लॅटफॉर्म असणाऱ्या Reddit कंपनीने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५ टक्के म्हणजे ९० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामुळे आता अमेरिकेतील कर्मचाऱ्यांची कपात करणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये Reddit चा समावेश झाला आहे.