आधार हा १२ अंकी क्रमांक आहे जो युआयडीएआयद्वारे भारतातील नागरिकांना जारी केला जाऊ शकतो. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच युआयडीएआय प्राधिकरणाकडून आधार क्रमांक दिला जातो. नावनोंदणी प्रक्रियेदरम्यान, वापरकर्त्यांना त्यांची डेमोग्राफिक आणि बायोमेट्रिक माहिती द्यावी लागते. आता देशातील बहुतेक गोष्टींसाठी आधार हे एक आवश्यक ओळख दस्तऐवज आहे. 

फेब्रुवारी महिन्यात देशभरामध्ये १ कोटींपेक्षा अधिक मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करण्यात आले आहेत. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) अनुसार, जानेवारी महिन्यामध्ये ५६.७ लाख इतकी नोंदणी झाली होती. त्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यामध्ये आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांनी वाढले आहे.

हेही वाचा : Mark Zuckerberg यांचे रॅम्प शो करतानाचे फोटोज झाले व्हायरल, जाणून घ्या सत्य

फेब्रुवारीमध्ये झाले १ कोटी मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक

UIDAI च्या निवेदनामध्ये असे सांगण्यात आले आहे की, फेब्रुवारी २०२३ मध्ये नागरिकांच्या विनंतीनंतर १०.९७ दशलक्षाहून अधिक मोबाइल नंबर लिंक केले गेले आहेत. जे जानेवारी महिन्याच्या तुलनेत ९३ टक्के जास्त आहेत. आधारशी पॅन नंबर करणे ही एक प्रमुख गोष्ट मानली जाते, ज्यामुळे मोबाईल क्रमांक आधारशी जोडण्यास चालना मिळाली. आतापर्यंत ९० कोटी नागरिकांनी त्यांचे मोबाइल नंबर लिंक केल्याची शक्यता आहे.

सुमारे १,७०० केंद्र आणि राज्य समाज कल्याण थेट लाभ हस्तांतरण (DBT) आणि सुशासन योजना आधारच्या वापरासाठी अधिसूचित करण्यात आल्या आहेत. जानेवारीत झालेल्या १९९ .६२ कोटींच्या तुलनेत आधार प्रमाणीकरण व्यवहारात फेब्रुवारीमध्ये १३ टक्क्यांनी वाढून २२६.२९ कोटी झाले आहे. UIDAI ने फेब्रुवारी २०२३ पर्यंत ९,२५५ .५७ कोटी आधार प्रमाणीकरण व्यवहारांची नोंद केली आहे.

हेही वाचा : खुशखबर! Layoffs च्या काळात ‘ही’ भारतीय कंपनी करणार १ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोबाईल नंबर आधार कार्डशी कसा लिंक करावा ?

१. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी सर्वप्रथम UADAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
२. त्यानंतर तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा.
३. आधार सेवा सेक्शनमधील वेरिफाइड आधार नंबर या पर्यायावर क्लिक करा.
४. प्रोसिड आणि व्हेरीफाईड बटणावर क्लीक करावे.
५. गो टू डॅशबोर्ड पर्यायावर क्लीक करा.
६. Locate Enrollment Center या पर्यायावर क्लिक करा.
७. तिथे विचारण्यात आलेली माहिती भरावी अणि कॅप्चा कोड टाकावा. त्यानंतर Locate Center बटणावर क्लिक करा.