आजच्या काळात आधार कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. आधारशिवाय मोबाईल सिम मिळत नाही, बँक खाते उघडले जात नाही आणि मुलांना शाळेत प्रवेश मिळत नाही. तसेच आधार कार्डमध्ये चुकीच्या माहितीमुळे किंवा प्रिंट चुकल्यामुळे तुमच्या नावात, पत्त्यात किंवा जन्मतारखेत काही चूक झाली असेल, तर तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

या किरकोळ चुका दुरुस्त करायच्या असतील, तर आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख आणि लिंग किती वेळा बदलता येईल हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) मर्यादा निश्चित केली आहे.

Free Aadhaar update details in marathi
Free Aadhaar update: उरला फक्त शेवटचा १ दिवस, आधारकार्डशी संबंधित ‘हे’ काम पटापट करा, अन्यथा…;
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
How To Apply Pan Card For Child
Pan Card For Minor :१८ वर्ष पूर्ण होण्याआधी काढू शकता पॅन कार्ड, फक्त ‘ही’ कागदपत्रे लागणार; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस…
How to Change Name and Journey Date On Train Ticket step by step guide Indian Railways irctc
रेल्वेची तिकीट काढलीय, पण ऐनवेळी नाव किंवा तारीख बदलायचीय? मग ‘ही’ माहिती एकदा वाचाच
Sharad Pawar group in Thane sent ten thousand postcards to President Draupadi Murmu demanded voting through ballot paper
ठाण्यात शरद पवार गटाने राष्ट्रपतींना पाठविली दहा हजार पोस्टकार्ड; मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची केली मागणी
Which Number Is Linked To Your Aadhaar Card
Aadhaar Card Update : आधार कार्डावरील मोबाईल नंबर बदलायचाय? मग कसा कराल अर्ज, काय आहे प्रोसेस? घ्या जाणून
Yugendra Pawar
Yugendra Pawar : लाखाच्या फरकाने पराभव, तरीही युगेंद्र पवारांचा मत पडताळणीसाठी अर्ज; म्हणाले, “जर अधिकार असेल…”
PAN 2.0 Apply Online Step By Step Guide For Your Application in marathi
PAN 2.0 Apply Online: नवीन पॅन कार्ड काही मिनिटांत येईल तुमच्या ईमेलवर; फक्त फॉलो करा ‘ही’ सोपी प्रोसेस

नावात सुधारणा

आधार कार्डमध्ये तुमच्या नावात काही चूक असल्यास तुम्ही ते जास्तीत जास्त दोनदा बदलू शकता. UIDAI च्या नियमांनुसार, तुम्ही तुमचे नाव ऑनलाइन किंवा ऑफलाइन दुरुस्त करू शकता.

आधार कार्डवर लिंग बदल करणे

मिस प्रिंटमुळे जर तुमच्या आधार कार्डमध्ये लिंग चुकीच्या पद्धतीने छापले गेले तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यासंदर्भातील अधिसूचना UIDAI ने २०१९ मध्ये जारी केली होती. असे सांगण्यात आले की जर लिंगामध्ये काही चूक असेल तर तुम्ही ती एकदा बदलू शकता, त्यासाठी तुम्हाला आधार नोंदणी/अपडेशन केंद्राला भेट द्यावी लागेल.

पत्त्यातील दुरुस्ती

साधारणपणे असे दिसून येते की अनेक लोकं त्यांच्या आधार कार्डमधील पत्ता चुकीचा असल्याची तक्रार करतात. आधारमध्ये घर क्रमांक, पथ क्रमांक यासारख्या चुका अनेकदा चुकीच्या असतात. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये फक्त एकदाच पत्ता अपडेट करू शकता.

जन्मतारखेत सुधारणा

जर तुम्हाला तुमच्या जन्मतारखेत काही बदल करायचा असेल तर UIDAI च्या नियमांनुसार तीन वर्षांच्या अंतराने बदलता येईल. म्हणजेच आधार कार्डमध्ये तुमची जन्मतारीख तीन वर्षे मागे किंवा तीन वर्षे पुढे असेल तर ती बदलता येणार नाही.

Story img Loader