UPI New Rule: यूपीआय (UPI) युजर्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. १ एप्रिलपासून गूगल पे, फोनपे व पेटीएम यांसारख्या अॅप्सद्वारे यूपीआय पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन नियम लागू होत आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने याबाबतची घोषणा केली आहे. ‘एनपीसीआय’ने दिलेल्या माहितीनुसार, यूपीआयशी लिंक असलेला मोबाईल नंबर कित्येक महिने बंद असेल, तर ते बँक अकाउंट यूपीआयममधून हटविण्यात येणार आहे, याचा अर्थ तुमचे बँक अकाउंट बंद मोबाईल नंबरशी लिंक असेल, तर ते डिलीट करण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला त्या नंबरवरून कोणतेही यूपीआय पेमेंट करता येणार नाही.

एनपीसीआयने ‘या ‘साठी घेतला निर्णय

दररोज वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या घटना लक्षात घेता, ‘एनपीसीआय’ने हा निर्णय घेतला आहे. ‘एनपीसीआय’ने दिलेल्या माहितीनुसार, बंद किंवा अॅक्टिव्ह नसलेल्या मोबाइल नंबर्समुळे बँकिंग आणि यूपीआय सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण होत आहे. त्यात टेलिकॉम ऑपरेटर हे बंद मोबाईल दुसऱ्या ग्राहकाला देतात. ज्यामुळे आर्थिक फसवणुकीचा धोका वाढतो.

अशा परिस्थितीत बँका वा UPI अॅप्लिकेशन्सद्वारे होणारे UPI व्यवहार सुलभ करण्यासाठी तुमच्या बँक अकाउंटशी एक अॅक्टिव्ह मोबाईल नंबर लिंक करणे अत्यंत गरजेचे आहे, असे ‘एनपीसीआय’ने स्पष्ट केले आहे.

कारण तुमच्या बँक अकाउंटला लिंक असलेला मोबाईल नंबर हा यूपीआयद्वारे पेमेंट ट्रान्स्फर करताना एक प्रमुख आयडेंटिफिकेशनचे काम करतो. त्यातून तुम्ही पाठविलेले पैसे योग्य मोबाईल नंबरवर म्हणजेच योग्य व्यक्तीकडे पोहोचले याची खात्री पटते; पण जर दीर्घकाळापासून तुमचा अॅटिव्ह नसलेला तुमचा मोबाईल नंबर दुसऱ्या ग्राहकाला दिला गेला असेल, तर त्यामुळे पेमेंट अयशस्वी होऊ शकते किंवा चुकीच्या व्यक्तीला पेमेंट जाऊ शकतो.

तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असलेला मोबाईल नंबर खूप काळापासून अॅक्टिव्ह नसेल किंवा रिचार्ज केलेला नसेल, तर तो नंबर तुमच्या नावावर अजूनही अॅक्टिव्ह आहे की नाही हे तपासण्यासाठी तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरशी (जसे की Jio, Airtel, Vi किंवा BSNL) संपर्क साधू शकता. जर तो मोबाईल नंबर अॅक्टिव्ह नसेल, तर तुम्ही तो ताबडतोब पुन्हा अॅक्टिव्ह करा किंवा तुमचे बँक अकाउंट नवीन मोबाइल नंबरसह अपडेट करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

NPCI ने बँका आणि UPI अॅप्लिकेशन्सना दर आठवड्याला त्यांच्या इनअॅक्टिव्ह मोबाईल नंबरच्या नोंदी सुधारण्याचे निर्देश दिले आहेत. आता नव्या नियमानुसार, १ एप्रिलपासून बँकिंग सिस्टीममधून सर्व इनअॅक्टिव्ह नंबर काढून टाकले जातील.