ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये तुम्ही कुठल्या एका शब्दापूर्वी हॅशचे (#) चिन्ह बघितले असेल. हे चिन्ह का दिले जाते, याचा काय उपयोग आहे. त्यातही अनेकदा या चिन्हाचा वापर का होतो? असे अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील. कधी कधी तर पोस्टपेक्षा अधिक हॅशटॅग दिसून येतात. नेटकरी याला इतकं महत्व का देतात. तुमच्या याच प्रश्नांचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.

काय आहे हॅशटॅग?

हॅशटॅग हे दोन शब्दांनी बनलेले आहे. हॅश आणि टॅग. सोशल मीडिया पोस्टमध्ये हॅशटॅगचा वापर केल्याने ती पोस्ट त्याच्याशी संबंधीत इतर पोस्टच्या श्रेणीमध्ये टाकली जाते. याने नेटकऱ्यांना ती पोस्ट शोधणे सोपी जाते. ती सहज दिसून येते. हॅशटॅग हे गुगलसाठी मेटाडेटा सारखे काम करते. याच्या मदतीने विविध श्रेणीतील सामग्री इंटरनेटवर हॅशटॅगच्या मदतीने सहज सर्च करता येऊ शकते.

(सायबर भामट्यांचा सुळसुळाट, 4G सिम 5G जी करण्याच्या नावाखाली ‘असा’ होत आहे लुटीचा प्रयत्न)

हॅशटॅगचा वापर केल्याने काय होते?

हॅशटॅगचा वापर केल्याने तुमचे पोस्ट सर्च रिझल्टमध्ये दिसू लागतात. युजरने किवर्डसह हॅश चिन्ह लावल्यास ती पोस्ट आणि त्यासंबंधी इतर पोस्ट हे सर्चमध्ये दिसून येतात. या पद्धतीने तुम्हाला आवडणारी पोस्ट शोधणे आणि त्यासंबंधी इतर पोस्ट मिळणे सोपे जाते. दरम्यान हॅशटॅग हे फॉलोवर्स वाढवण्साठी देखील मदत करू शकते. याच्या मदतीने तुम्ही इन्स्टाग्रामवर आपले फॉलोवर्स वाढवू शकता.

इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स वाढवण्साठी हॅशटॅग कसे मदत करते?

इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स वाढवण्यासाठी तुमचे कंटेंट हे अनोखे आणि मजेदार असायला हवे. मजेदार पोस्ट युजरना खूप आवडतात. अशा पोस्टने युजर तुमच्या इतर पोस्ट देखील बघतात, आणि आवडल्यास त्या शेअर देखील करतात, आणि फॉलोवर बनतात. तुमचे कंटेंट पाहून फॉलोवर्सची संख्या वाढते.

(व्हॉट्सअ‍ॅप वापरताना चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका, अन्यथा खाते बंद होऊ शकते)

पण, इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स वाढवण्यात हॅशटॅग देखील महत्वाची कामगिरी बजावते. याने तुमच्या पोस्टची रीच वाढते. म्हणजेच पोस्ट जास्तीत जास्त लोकांना दिसून येते. आता फॉलोवर्स वाढवण्यासाठी हॅशटॅग लावायचे कसे, याबाबत जाणून घेऊया.

इन्स्टाग्रामवर हॅशटॅगचा वापर कसे कराल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासाठी तुमचे इन्स्टाग्राम खाते पब्लिक असायला हवे. पोस्टला हॅशटॅग जोडल्यास ती पोस्ट संबंधित हॅशटॅग पेजवर दिसून येईल. फोटो किंवा व्हिडिओला हॅशटॅग जोडण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

  • इन्स्टाग्रामवर फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करा.
  • फिल्टर अ‍ॅड करा आणि नंतर फोटो किंवा व्हिडिओसाठी पुढे जाण्यावर टॅप करा.
  • ‘कॅप्शन लिहा’ यावर टॅप करा नंतर # चिन्ह टाकल्यानंतर टेक्स्ट लिहा किंवा इमोजी टाका. (उदाहरण – #vegetables)
  • त्यानंतर फोटोसाठी ‘डन’ आणि व्हिडिओसाठी शेअर करण्याच्या बटनवर क्लिक करा.