आपण अनेकवेळा ‘गूगल पे’वरून पेमेंट करतो. त्यावर मिळणारे कॅशबॅक युजर्सना आकर्षित करण्यासाठी दिले जातात. जेव्हा गूगल पे लाँच जाले होते तेव्हा बऱ्याचवेळा कॅशबॅक दिला जायचा पण थोड्या दिवसांनंतर कॅशबॅकचे प्रमाण कमी झाले. पण कॅशबॅक जास्त मिळावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. एक ट्रिक वापरून तुम्ही जास्त कॅशबॅक मिळवू शकता. काय आहे ही ट्रिक जाणून घ्या.

गूगल पे प्लॅन निवडा
‘गुगल पे’वर अनेक प्लॅन्सची ऑफर असते. या प्लॅन अंतर्गत जर पेमेंट केले तर तुम्हाला एका निश्चित रकमेचा कॅशबॅक नक्की मिळेल. तुम्ही गॅस बिल, पेट्रोल बिल, वीज बिल असे पेमेंट करून कॅशबॅक मिळवू शकता.

आणखी वाचा : फोन चोरी झाल्यास ॲप्पल आणि सॅमसंग युजर्सना कळणार लोकेशन; जाणून घ्या काय आहे नवे फीचर

वेगवेगळ्या अकाउंटवर पेमेंट करा
एका अकाउंटवर मोठ्या रकमेची पेमेंट केल्याने जास्त रकमेचा पेमेंट मिळेल असे वाटू शकते, पण असे होत नाही. जर तुम्हाला कॅशबॅक हवा असेल तर तुम्ही वेगवेगळ्या अकाउंट वर पेमेंट करा ज्यामुळे जास्त कॅशबॅक मिळु शकतो.

तसेच एकाच वेळी मोठ्या रकमेची पेमेंट केल्यास जास्त कॅशबॅक मिळत नाही, त्यामुळे ती रक्कम विभागून वेगवेगळ्या अकाउंटवर पाठवा. यामुळे प्रत्येक पेमेंटबरोबर तुम्हाला कॅशबॅक मिळेल.