फेसबूक हे मेटाचे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबूकच्या माध्यमातून वापरकर्ते जगातील कोणत्याही व्यक्तीशी मैत्री करू शकतात, त्यांच्याशी संवाद साधू शकतात. फेसबूकही वापरकर्त्यांना अधिक आकर्षित करण्यासाठी सतत नवे फीचर्स लाँच करत असते. आपण बऱ्याचदा ऑफिसमधील लॅपटॉपवरून किंवा इतर कोणत्याही डिवाइसमधून फेसबूक लॉगइन करतो. पण काहीवेळा त्या डिवाइसमधून लॉगआऊट करायला विसरतो. यामुळे इतर कोणीही तुमचे फेसबूक अकाउंट वापरू शकते.

तुम्ही जर असे लॉग आऊट करायला विसरला असाल तर इतर कोणी तुमचे अकाउंट वापरत आहे का हे एक ट्रिक वापरून तुम्ही लगेच ओळखू शकता कोणती आहे ही ट्रिक जाणून घ्या. दुसरं कोणी तुमचं फेसबूक अकाउंट वापरत आहे का हे जाणून घेण्यासाठी, सर्वात आधी तुम्ही कोणकोणत्या डिवाइसवरून लॉग इन केले आहे ते तपासा. याचा पर्याय फेसबूकवर उपलब्ध असतो. पुढील स्टेप्स वापरून तुम्ही तुमचे फेसबूक अकाउंट फक्त तुम्हीच वापरत आहात, याची खात्री करू शकता.

आणखी वाचा : Laptop Hacks : लॅपटॉप स्लो झाला आहे का? ‘ही’ पद्धत वापरून वाढवा स्पीड

या स्टेप्स वापरून ओळखा कोणत्या डिवाईसमध्ये आहे तुमचे फेसबूक लॉग इन

  • सर्वात आधी फेसबूक उघडुन उजव्या बाजूला असणाऱ्या तीन आडव्या रेषांवर क्लिक करा.
  • त्यामधील सेटिंग्स पर्यायावर क्लिक करा.
  • त्यामध्ये पासवर्ड अँड सेक्योरिटी या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यामध्ये लॉग इन डिवाइस हा पर्याय दिसेल, या पर्यायामधील सी ऑल हा पर्याय निवडुन तुम्ही सर्व लॉग इन डिवाइसची यादी पाहू शकता.
  • या यादीमधील लिस्टच्या पुढे तीन डॉट्सचा पर्याय असेल त्यावर क्लिक करुन तुम्ही डिवाइसमधून लॉग आऊट करू शकता.
  • तसेच इथे ज्या डिवाईसमध्ये तुमचे फेसबूक लॉग इन आहे त्याचे लोकेशन देखील ओळखता येते. यामुळे तुम्ही तुमचे अकाउंट अधिक सुरक्षित करू शकाल.