scorecardresearch

व्होडाफोन आयडियाचा ‘वर्क फ्रॉम होम’ प्लान, इंटरनेटची सेवा मिळणार फास्ट

कोविड महामारीमुळे शाळा-महाविद्यालयांपासून कार्यालयांपर्यंत सर्वांचे काम घरातून सुरू झाले आहे. त्यामुळे प्रत्येक घरात इंटरनेटचा वापर खूप वाढला आहे.

व्होडाफोन आयडियाचा ‘वर्क फ्रॉम होम’ प्लान, इंटरनेटची सेवा मिळणार फास्ट
या प्लॅनमध्ये यूजरला २००Mbps च्या डेटा स्पीडनुसार दर महिन्याला ३.५TB इंटरनेट मिळते. (photo credit: file photo)

देशातील प्रत्येक टेलिकॉम कंपन्यांनी प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅनसह ब्रॉडबँड प्लान ऑफर करणे सुरू केले आहे. कोविड महामारीमुळे शाळा-महाविद्यालयांपासून कार्यालयांपर्यंत सर्वांचे काम घरातून सुरू झाले आहे. त्यामुळे प्रत्येक घरात इंटरनेटचा वापर खूप वाढला आहे. आज आम्ही तुमच्यासाठी व्होडाफोन किंवा Vi च्या सर्वोत्तम ब्रॉडबँड प्लॅनचे पर्याय घेऊन आलो आहोत.

व्होडाफोन आयडिया ब्रॉडबँड प्लान

ऑनलाइन काम तसेच वर्क फ्रॉम होम कामाच्या या काळात हायस्पीड इंटरनेटची प्रत्येकाला गरज आहे. जी मोबाइल डेटापेक्षा फायबर ब्रॉडबँड कनेक्शनद्वारे पूर्ण होते. सरकारी दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडिया ही तिच्या एका उपकंपनी, ‘You Broadband’ द्वारे अप्रतिम ब्रॉडबँड प्लान ऑफर करते. तुम्हाला यू ब्रॉडबँडच्या दोन आश्चर्यकारक ब्रॉडबँड प्लान पर्यायांबद्दल सांगणार आहोत.

व्होडाफोन आयडियाचा २००mbps स्पीड असलेला प्लान

व्होडाफोन आयडियाच्या या प्लॅनमध्ये यूजरला २००Mbps च्या डेटा स्पीडनुसार दर महिन्याला ३.५TB इंटरनेट मिळते. तसेच जर वापरकर्त्याला कंपनीकडून मॉडेम आणि राउटर घ्यायचे असेल तर ते १,९९९रुपये एकवेळ सुरक्षा ठेव भरून ते करू शकतात. दरम्यान ही ठेव परत करण्यायोग्य आहे. तसेच या प्लानसाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला १,०६२ रुपये द्यावे लागतील, ज्यामध्ये GST आधीच समाविष्ट असणार आहे.

व्होडाफोन आयडियाचा १००mbps स्पीड असलेला प्लान

व्होडाफोन आयडियाच्या ८२६ रुपये प्रति महिना असलेल्या या प्लॅनमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्यासाठी एकूण ३.५GB डेटा देखील मिळतो. जर वापरकर्त्याला कंपनीकडून मॉडेम आणि राउटर घ्यायचे असेल तर ते १,९९९ रुपये एकवेळ सुरक्षा ठेव भरून ते करू शकतात. तसेच वापरकर्त्यांनी लक्षात घ्या की ही ठेव परत करण्यायोग्य आहे. या प्लानच्या किमतीत GST आधीच समाविष्ट आहे.

तसेच वरील ज्या योजना सांगितल्या आहेत, त्या देशातील सर्व शहरांमध्ये उपलब्ध नाहीत. यू ब्रॉडबँडच्या योजना शहर-शहरावर अवलंबून असतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2022 at 18:46 IST