प्रत्येक सणाच्या निमित्ताने खरेदीदारांना नव्या वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची चांगली संधी मिळते. विविध कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक वस्तूंवर आकर्षक सवलती देत असतात. आज होळी, तर उद्या रंगपंचमी हा सण आहे. तर, या सणानिमित्त सॅमसंगने काही दिवसांपूर्वी सेलची घोषणा केली होती. तर, आज ‘विजय सेल्स’नेही ग्राहकांसाठी खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

विजय सेल्सने स्पीकर, स्टायलिंग टूल्स, एअर कंडिशनर्स, किचन अप्लायन्सेस, कॅमेरे या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ६० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. ग्राहकांना कोणते उपकरण या सेलमध्ये किती रुपयांना खरेदी करता येईल याची यादी पाहू.

Loksatta Career When dealing with workload
ताणाची उलघड :कामाचा ताण हाताळताना
Loksatta kutuhal Artificial Intelligence in Cyber crime
कुतूहल: सायबर गुन्ह्यांतील कृत्रिम बुद्धिमत्ता
loksatta kutuhal cyber crime and artificial intelligence
कुतूहल : सायबर गुन्हे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता…
Agra Income tas raids
पलंग, पिशव्या अन् चपलांच्या बॉक्समध्येही ऐवज! IT च्या धाडीत सापडलं कोट्यवधींचं घबाड, अधिकारी रात्रभर पैसेच मोजत बसले!
Sarvesh Mutha and Adar Poonawalla
‘सीरम’कडून इंटिग्रीमेडिकलच्या २० टक्के भागभांडवलाचे संपादन
disability certificates, disabled persons,
‘ऑनलाइन’ सरकारी खोळंबा अन् केंद्रीय मंत्रालयाकडे बोट!
BECIL Recruitment 2024
BECIL Recruitment 2024 : पदवीधारकांना नोकरीची संधी! ३० हजार पगार मिळणार, आजच अर्ज करा
Why did RBI advise banks to refund money
RBI ने बँकांना कर्जदारांना जास्त व्याज आकारल्याबद्दल पैसे परत करण्याचा सल्ला का दिला?

विजय सेल्समध्ये पोर्टेबल ब्ल्यूटूथ स्पीकर्स सुरुवातीच्या किमतीत म्हणजे फक्त ४४९ रुपयांना मिळणार आहे. ६० डब्ल्यू पोर्ट्रोनिक्स डॅश, १२ बूमबॉक्स ६,९९९ रुपयांना. तर लोकप्रिय मार्शल एम्बर्टन (II) १४,९९९ रुपयांना या सेलमध्ये उपलब्ध आहे. दरम्यान, सोनीचे थम्पिंग पार्टी स्पीकर ३२,९०० रुपयांना तुम्ही या सेलमध्ये खरेदी करू शकता.

हेही वाचा…IPL 2024: आयपीएल पाहण्यासाठी Vi चे बेस्ट प्लॅन्स; मोफत डेटा अन् आकर्षक डिस्काउंट… ‘या’ ग्राहकांना घेता येणार लाभ

एखाद्या खास दिवशी सुंदर दिसण्यासाठी तरुणी, महिला विजय सेल्समध्ये वेगा थ्री इन वन स्टायलर (Vega 3-in-1 Styler) १,३५० रुपयांना खरेदी करू शकता; ज्याची मूळ किंमत १,९९९ रुपये एवढी आहे. तर, या सेलमध्ये हेअर ड्रायर व स्ट्रेटनरची किंमत ४४९ रुपयांपासून सुरू आहे.

तसेच विजय सेल्सचे ७,९९० रुपयांपासून मिळणारे रेफ्रिजरेटर्स आणि २५,१९० रुपयांचे एअर कंडिशनर ग्राहकांना उन्हाळ्यातील उष्णतेवर मात करण्यास मदत करतील. सेलमध्ये असणारा ५,९९९ रुपयांचा Instax कॅमेरा ग्राहकांना झटपट नॉस्टॅल्जिक फोटो प्रिंट काढून देण्यास साह्य करील.

विजय सेल्समध्ये १,९९९ रुपयांपासून सुरू होणारे व्हॅक्युम क्लीनर; तर ७,९९० रुपयांपासून सुरू होणारी वॉशिंग मशीन ग्राहकांना स्वछ कपडे धुऊन देण्यास मदत करील. तसेच ६,६९० रुपयांपासून सुरू होणारे मायक्रोवेव्ह, ब्लेंडर व ज्युसर; तर ५,९४४ रुपयांचे एअर फ्रायर्स तुम्हाला विविध पदार्थ बनविण्यासाठी मदत करतील.

ग्राहकांना या खरेदीवर ०.७५ टक्के रिवॉर्ड पॉइंटस मिळवून आणि ७,५०० रुपयांपर्यंतच्या बँक कार्ड ऑफरचा लाभ घेऊन आणखी बचत करता येणार आहे. तेव्हा, होळीनिमित्त विजय सेल्समध्ये तुम्हाला या वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.