scorecardresearch

Vivo Y21G स्मार्टफोन लॉन्च, तासनतास वापरल्यानंतरही गरम होणार नाही, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीने ७ एप्रिल रोजी नवीन Vivo Y21G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनला Multi-Turbo 5.0 सह MediaTek MT6769 प्रोसेसर मिळेल, जो डेटा आणि स्मार्टफोनला इतर स्मार्टफोनच्या तुलनेत खूप वेगवान बनवतो.

Vivo
(फोटो सोर्स : वीवो)

Vivo आपल्या Y मालिकेतील स्मार्टफोन्सना आणखी पुढे नेत आहे. कंपनीने ७ एप्रिल रोजी नवीन Vivo Y21G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनला Multi-Turbo 5.0 सह MediaTek MT6769 प्रोसेसर मिळेल, जो डेटा आणि स्मार्टफोनला इतर स्मार्टफोनच्या तुलनेत खूप वेगवान बनवतो.

विवोच्या मते, कंपनीने लेटेस्ट Y21G स्मार्टफोनमध्ये कूलिंग सिस्टम दिली आहे, जी या स्मार्टफोनला बराच वेळ वापरल्यानंतरही थंड ठेवते. यासोबतच कंपनीने या स्मार्टफोनमध्ये एक अपडेट अल्ट्रा गेमिंग ट्विस्ट देखील दिला आहे, जो स्मार्टफोनवर गेम खेळणाऱ्या लोकांना एक नवीन अनुभव देईल.

याशिवाय, कंपनीने नवीन Vivo Y21G स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर फीचर देखील दिले आहे. यासोबतच स्मार्टफोनचा अधिक वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीने या स्मार्टफोनच्या स्क्रीनमध्ये आय प्रोटेक्शन मोड देखील दिला आहे जो फिल्टर आणि निळ्या प्रकाशाने डोळ्यांना आराम देतो.

Vivo Y21G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 5000mAh बॅटरी पॅक केली आहे जी 18W फास्ट चार्जरला सपोर्ट करते. यासोबतच, स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 13MP , प्रायमरी सेन्सर आणि 2MP सुपर मायक्रो कॅमेराने सुसज्ज आहे. जे गरजेनुसार पोर्ट्रेट मोड, सुपर एचडीआर आणि नाईट मोडमध्ये अॅडजस्ट केले जाऊ शकते. तसंच सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये AI ब्यूटीफाय फिचर्ससह 8MP मॉड्यूल आहे, जे प्रकाशानुसार सेल्फी घेण्यास उपयुक्त आहे.

Vivo Y21G स्मार्टफोनमध्ये कंपनीने Android 12 Best OS 12 ऑपरेटिंग सिस्टम दिली आहे. तसंच, हा स्मार्टफोन मिडनाईट ब्लू आणि डायमंड ग्लो या दोन कलरच्या ऑप्शनमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. सध्या या स्मार्टफोनची किंमत कंपनीने जाहीर केलेली नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vivo y21g smartphone launch not be hot even after using for hours know features and specifications prp

ताज्या बातम्या