वोडाफोन-आयडिया (Vi) भारतातील सर्वात मोठी तिसरी मोठी टेलिकॉम कंपनी आहे. वोडाफोन-आयडिया कंपनीला अजून आपले ५जी नेटवर्क देशामध्ये सुरू करता आलेले नाही. लवकरच ५जी नेटवर्क कंपनी सुरू करण्याची शक्यता आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी रिचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. कंपनीकडे अनेक रिचार्ज प्लॅन्स आहेत ज्यात ग्राहकांना अनेक फायदे मिळतात. तसेच कंपनीकडे एका वर्षाची वैधता असणारे देखील प्लॅन आहे. एका वर्षाच्या वैधता असणाऱ्या प्लॅन जर का तुम्ही शोधत असाल तर तो प्लॅन कोणता आहे आणि त्यामध्ये कोणकोणते फायदे मिळतात ते जाऊन घेऊयात.

भारतातील ग्राहक म्हणून, आम्हाला दैनदिन डेटा लिमिटच्या प्रीपेड प्लॅन्स पाहण्याची सवय आहे. मात्र असे काही प्लॅन्स आहेत जे ग्राहकांना बल्कमध्ये डेटा ऑफर करते. याचा अर्थ त्यामध्ये दैनंदिन डेटाच्या वापरावर मर्यादा नाही. आज आपण अशाच एका प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

हेही वाचा : UPI Lite फिचर ‘गुगल पे’ वर कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स

Vodafone-Idea चा २,९९९ रुपयांचा प्लॅन

वोडाफोन-आयडियाच्या २,९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये एका वर्षाची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला ट्रूली अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, ८५० जीबी महिन्याला डेटा आणि दररोज १०० एसएमएस असे फायदे मिळतात. Vodafone Idea प्लॅनसह अतिरिक्त फायदे देखील देते. तुम्हाला Binge All Night ऑफर मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचा अर्थ असा होतो की, तुम्ही दररोज रात्री १२ ते पहाटे ६ दरम्यान तुम्ही पाहिजे तेवढा डेटा तुम्ही वापरू शकता. त्यानंतर Vi Movies & TV Classic मध्ये मोफत प्रवेश या प्लॅनमध्ये मिळतो. यामध्ये इतर कोणतेही OTT फायदे समाविष्ट नाहीत. कारण अनेक वार्षिक प्लॅन दैनंदिन डेटा लिमिटसह येतात. ज्यांना फक्त प्रीपेड प्लॅन रिचार्ज करायचे आहे त्यांच्यासाठी हे चांगला प्लॅन आहे. तुम्ही दररोज २ जीबी पेक्षा जास्त डेटा सहजपणे वापरू शकता. तसेच तरीही तुम्ही दररोज डेटा वापरण्यास सक्षम असाल. परंतु ज्या दिवशी तुम्हाला कमी वापरायचे आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्या दिवशी जास्त वापर करू शकत नाही.