ऐन दिवाळीच्या तोंडावर टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने वापरकर्त्यांसाठी धमाकेदार दिवाळी ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत वापरकर्त्यांना १८ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान मोबाईल रिचार्जवर ७४ जीबी पर्यंत अतिरिक्त डेटा मोफत मिळेल. दिवाळीनिमित्त ग्राहकांना कंपनीने दिलेली ही मोठी भेट आहे.

कोणत्या प्लॅनवर मिळेल ही खास ऑफर?

कंपनीची ही खास ऑफर १,४४९ रुपये आणि २,८९९ रुपयांच्या प्लॅनसाठी वैध आहे. हे नवीन प्रीपेड प्लान्स नसून कंपनी सध्याच्याच प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा ऑफर करत आहे. या प्लॅन्समध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि दैनंदिन डेटा देखील मिळेल, ज्याची वैधता एक वर्षापर्यंत आहे. याशिवाय कंपनी डिस्ने हॉटस्टार मोबाईलचे फ्री सब्सक्रिप्शनही देईल.

आणखी वाचा : रिलायन्स जीओचा दिवाळी धमाका: भन्नाट ऑफर जाहीर; मिळवा ६,५०० रुपयांपर्यंतचा फायदा

  • १,४४९ रुपयांच्या प्लॅनचे फायदे

१,४४९ कंपनीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज १०० मोफत एसएमएसही मिळतील. यासाठी तुम्हाला १८० दिवसांची वैधता मिळेल. प्लॅनमध्ये, इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला दररोज एकूण १.५ जीबी डेटा मिळेल. प्लॅनमध्ये कंपनी दिवाळी ऑफर अंतर्गत ५० जीबी डेटा मोफत देत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • २,८९९ रुपयांच्या प्लॅनचे फायदे
    २,८९९ रुपयांचा प्लॅनमध्ये तुम्हाला ३६५ दिवसांची वैधता मिळेल. कंपनीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसोबत दररोज १०० मोफत एसएमएसही मिळतील. तुम्हाला दररोज एकूण १.५ जीबी डेटा मिळेल. आणि Vi Movies आणि TV VIP ऍक्सेस मिळतील. व्होडाफोन-आयडियाच्या वेबसाइटनुसार, यामध्ये रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना आता ७५ जीबी बोनस डेटा मिळेल.