वोडाफोन-आयडिया, रिलायन्स जिओ आणि एअरटेलसह अन्य टेलिकॉम कंपन्यांनी देखील भारतीय बाजारपेठांमध्ये डिस्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळणारे प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत. तर रिलायन्स जिओने नुकतेच आपले डिस्नी + हॉटस्टारचे बंडल प्लॅन देखील लॉन्च केले आहेत. जर का तुम्ही डिस्नी + हॉटस्टार बंडल प्रीपेड प्लॅनसाठी जास्त खर्च करू इच्छित नसाल तर वोडाफोन – आयडियाकडे एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. या प्लॅनची किंमत २०० रुपयांपेक्षा कमी आहे. जर तुम्ही डिस्नी+ हॉटस्टार मोबाइलचे सबस्क्रिप्शन खरेदी करू इच्छित असाल तर कमीत कमी तीन महिन्यांसाठी १४९ रुपये मोजावे लागतात .

वोडाफोन-आयडिया देशातील तिसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे. अजून व्हीआयला आपले ५ जी नेटवर्क सुरु करता आलेले नाही. मात्र लवकरच ते लॉन्च होण्याची शक्यता आहे. तसेच व्हीआयकडे २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा एक प्रीपेड प्लॅन आहे . जो डिस्नी+ हॉटस्टारसह येतो. हा प्लॅन सध्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा सुरु असल्याने वापरकर्त्यांना फायदेशीर ठरू शकतो. कारण डिस्नी + हॉटस्टारवर आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा पाहता येत आहेत. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

हेही वाचा : आजपासून सुरू झाला Apple चा फेस्टिवल सेल; ‘या’ माध्यमातून जुना फोन करता येणार एक्सचेंज, जाणून घ्या

वोडाफोन आयडियाच्या ज्या प्लॅनबद्दल आपण चर्चा करत आहोत तो प्लॅन १५१ रुपयांचा आहे. डिस्नी + हॉटस्टारचे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन १४९ रुपये आहे. व्हीआयचा हा प्लॅन त्यापेक्षा २ रुपयांनी महाग आहे. जर का तुम्ही हा प्लॅन घेतला तर तुम्हाला डिस्नी + हॉटस्टार मोबाइलचे स्टॅन्ड अलोन सबस्क्रिप्शनपेक्षा अधिक फायदा होऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वोडाफोन- आयडियाचा १५१ रूपयांचा प्लॅन

वोडाफोन- आयडियाचा १५१ रुपयांचा डेटा व्हाउचर प्लॅनमध्ये तुम्हाला ८ जीबी डेटा मिळतो. यामध्ये एकूण ८ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे. हे ऍक्टिव्ह नसलेल्या सिम किंवा प्रीपेड रिचार्ज नसलेल्या सिमवर हा प्लॅन काम करणार नाही. यासाठी १५१ रुपयांच्या प्लॅनद्वारे दिला जाणारा डेटाचा वापरण्यासाठी तुमच्याकडे व्हॉइस कॉलिंगचा फायदा असणारा एक बेस प्लॅन असणे आवश्यक आहे.