Bluebugging Attack : हॅकिंगद्वारे युजरची खासगी माहिती चोरी करून तिचा गैरवापर होण्याचा धोका बळवाला आहे. अलिकडेच व्हॉट्सअ‍ॅपच्या ५० कोटी युजर्सचा डेटा हॅकिंग फॉरमवर विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचे काही अहवालांतून समोर आले होते. आता ट्विटरच्याही ५४ लाख युजर्सचा डेटा लिक झाल्याचे समोर आले आहे. ही धोक्याची घंटा असून युजर्सनी आपले ऑनलाईन खाते आणि फोनमधील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण, Bluebugging नावाचा एक हॅकिंगचा प्रकार चर्चेत आला आहे. काय आहे हे ब्लूबगिंग? याबाबत आपण जाणून घेऊया.

ब्लूबगिंग ही हॅकिंगची एक प्रक्रिया असून त्याद्वारे हॅकर शोधण्यायोग्य ब्लूटूथ कनेक्शन असणाऱ्या उपकरणांमध्ये प्रवेश मिळवू शकतात. उपकरण किंवा फोन ब्लूबग झाल्यावर हॅकर्स कॉल्स ऐकू शकतात, मेसेज वाचू किंवा पाठवू शकतात आणि कॉन्टॅक्ट्स चोरू शकतात किंवा त्यात बदल करू शकतात. सुरुवातीला हे केवळ ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असणारे संगणक किंवा लॅपटॉप्सना हानी पोहोचवेल असे दिसत होते. मात्र, नंतर मोबाईल फोन आणि इतर गॅजेट्ससुद्धा हॅकर्सचे लक्ष्य झाले.

UPSC Civil Services Result 2023 Marathi News
UPSC Result 2023: नागरी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर; असा पाहा ऑनलाइन निकाल
they were cheating people by mixing water in petrol people of jaipur exposed watch viral video
तुम्ही गाडीत पेट्रोलबरोबर पाणी तर भरत नाही ना! पाहा पेट्रोलपंपावरील घोटाळ्याचा धक्कादायक VIDEO
aditi sarangdhar shares private ride bad experience
Video : “अतिशय घृणास्पद, लाजिरवाणा प्रकार”, खासगी कारचालकावर ‘वादळवाट’ फेम अदिती सारंगधर संतापली, म्हणाली…
Porn Bots Pops Up On Screen Because You Engage With It Says Former Meta Employee
स्क्रोल करताना अचानक पॉर्नसारखे व्हिडीओ का दिसतात? मेटाच्या माजी सहसंस्थापकाच्या पोस्टमुळे नेटकरी भडकले

(COFFEE MAKER घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, फायद्यात राहाल)

कोणती उपकरणे धोक्यात?

ब्लूटूथ असलेली कोणतीही उपकरणे ब्लूबगद्वारे हॅक होऊ शकतात. एकदा डिव्हाइस हॅक झाल्यावर सायबल हल्लेखोर तुमचे कॉन्टॅक्ट चोरू शकतो किंवा त्यात बदल घडवू शकतो, संभाषण ऐकू शकतो किंवा करू शकतो, मेसेज वाचू शकतो किंवा ते पाठवूदेखील शकतो.

डिबगिंगचा वापर कसा होतो?

ब्लूटूथच्या सहायाने डिबगिंग हल्ला होतो. यासाठी डिव्हाइसमधील ब्लूटूथ डिस्कवरेबल मोडमध्ये ठेवावा लागतो. नंतर हॅकर ब्लूटूथद्वारे डिव्हाइसशी जुळण्याचा प्रयत्न करतो. डिव्हइसशी जुळल्यानंतर हॅकर ऑथेंटिकेशन प्रक्रिया पार करण्यासाठी ब्रुट फोर्स अटॅक करू शकतो, तसेच हॅक झालेल्या डिव्हाइसमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवण्यासाठी त्यात तो मालव्हेअर देखील टाकू शकतो. जेव्हा ब्लूटूथ सुरू असलेला डिव्हाइस हॅकरच्या १० मीटरच्या आत असतो तेव्हा असे करता येऊ शकते.

(ग्रामीण भागात इटरनेटसाठी ‘BSNL’ला वीज व जमीन राज्य सरकारकडून मोफत)

ब्लूबगिंग कसे टाळायचे?

काम नसताना ब्लूटूथ बंद करू ठेवले पाहिजे आणि डिव्हाइसशी ब्लूटूथद्वारे जोडलेले इतर डिव्हाइस हटवले पाहिजेत. डिव्हाइसमधील सिस्टम सॉफ्टवेअर अपडेट केले पाहिजे, सार्वजनिक वायफायचा वापर कमी केला पाहिजे आणि सुरक्षेसाठी व्हीपीएनचा वापर केला पाहिजे.
इतरांना तुमचे ब्लूटूथ डिव्हाइस सापडू नये यासाठी सर्वप्रथम ब्लूटूथ सेटिंग बंद केली पाहिजे. याद्वारे तुमचे डिव्हाइस हॅकर्सना दिसणार नाही आणि त्यांना पेअरिंग करता येणार नाही.