scorecardresearch

WhatsApp ने आणलंय मल्टी-डिव्हाईस फीचर, आता ५ डिव्हाईसमध्ये अकाउंट चालवता येतील

इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने त्याचे मल्टी-डिव्हाइस फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून यूजर्स आता एकच व्हॉट्सअॅप अकाउंट अनेक डिव्हाईसमध्ये चालवू शकतील.

Whatsapp

इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने त्याचे मल्टी-डिव्हाइस फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून यूजर्स आता एकच व्हॉट्सअॅप अकाउंट अनेक डिव्हाईसमध्ये चालवू शकतील. आतापर्यंत, इतर कोणत्याही डिव्हाईसमध्ये, व्हॉट्सअॅप उघडण्यासाठी, स्मार्टफोनवरून QR कोड स्कॅन करावा लागत होता. पण बीटा व्हर्जनमध्ये व्हॉट्सअॅपने मल्टी डिव्हाईस फीचर सक्रिय केले आहे. त्यानंतर युजर्स कोणत्याही अडचणीशिवाय ५ वेगवेगळ्या डिव्हाईसवर एक WhatsApp अकाउंट चालवू शकतील.

मल्टी-डिव्हाइस फिचर्स कसे कार्य करते – आत्तापर्यंत, युजर्सना प्रत्येक वेळी स्मार्टफोनशिवाय इतर डिव्हाइसवर WhatsApp उघडताना लॉग इन करण्यासाठी स्मार्टफोन कनेक्ट करावा लागत होता. पण मल्टी डिव्हाईस फीचरच्या रोलआउटनंतर यूजर्सला पुन्हा पुन्हा लॉग इन करावे लागणार नाही. कंपनीने हे फीचर व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये आणले आहे.

जर तुम्ही तुमच्या डिव्हाईसमध्ये बीटा व्हर्जन अपडेट केले नसेल, तर हे फीचर वापरण्यापूर्वी तुम्हाला लॅपटॉप, कॉम्प्युटरसह इतर डिव्हाईसमध्ये बीटा व्हर्जन अपडेट करावे लागेल. त्यानंतरच यूजर्स व्हॉट्सअॅपचे मल्टी डिव्हाइस फीचर वापरू शकतील.

Android आणि iOS युजर्ससाठी केव्हा आणले जाईल – WhatsApp या महिन्याच्या अखेरीस iOS युजर्ससाठी मल्टी डिव्हाइस फिचर्स रोल आउट करू शकते. WhatsApp पुढील महिन्यात Android युजर्ससाठी मल्टी-डिव्हाइस फिचर रोल आउट करू शकते. WhatsApp च्या मालकीच्या कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

मेसेज रिअॅक्शन फीचर रोल आउट – व्हॉट्सअॅपने बीटा अपडेटसह अँड्रॉइड यूजर्ससाठी मेसेज रिअॅक्शन फीचर रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. कंपनी खूप दिवसांपासून यावर काम करत होती. माहितीनुसार, सध्या यूजर्सना फक्त ६ रिअॅक्शन इमोजी मिळत आहेत. लाइव्ह, लव, लाफ, सर्प्राइज़्ड, सेड आणि थॅंक्स या इमोजींचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की हे फीचर्स फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्ससाठी आधीच उपलब्ध आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Whatsapp rolls out multi device feature now accounts can be run in 5 devices prp

ताज्या बातम्या