व्हॉट्सअ‍ॅप लवकरच एक नवे फीचर आणणार असून, यामुळे ग्रुपच्या अ‍ॅडमिनला ग्रुपवरील मेसेज सर्वांसाठीच डिलीट करता येणार आहेत (delete messages for everyone). यामुळे ग्रुपच्या विचारसरणीशी सुसंगत नसलेले मेसेज ग्रुपमधील सदस्यांनी बघायच्या आधी हटवण्याचा अधिकार अ‍ॅडमिनला असेल. Wabetainfoने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील मेसेज डिलीट करण्याची सुविधा लवकरच अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. “जर तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन असाल, तर व्हॉट्सअ‍ॅप बीटाच्या येणाऱ्या अपडेटमध्ये तुम्हाला ग्रुपमधील मेसेज सर्वांसाठी डिलीट करता येणे शक्य होणार आहे.” असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप फीचर्स ट्रेकरने शेअर केलेल्या स्क्रीनशॉट्सनुसार, जेव्हा एखादा अ‍ॅडमिन एखादा मेसेज डिलीट करतो तेव्हा “This was deleted by an admin” अशी नोट दिसेल. कोणत्या अ‍ॅडमिनने मेसेज डिलीट केला आहे हे देखील ग्रुपच्या सदस्यांना समजू शकेल. हे फीचर वापरात आल्यानंतर, ग्रुप अ‍ॅडमिनसाठी अश्लील किंवा आक्षेपार्ह संदेश हटवणे सोपे होईल. तसेच, ग्रुपच्या हिताच्या विरोधात जाणारे मेसेज काढून टाकण्यात अ‍ॅडमिनला मदत होईल.

how scam callers find numbers
स्कॅम कॉल करणाऱ्यांना तुमचा नंबर कसा मिळतो? स्वतःच्या सुरक्षेसाठी ‘ही’ माहिती जाणून घ्या…
Is Beetroot Really Vegetable Viagra How Eating Beet Helps For Sex Drive
बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?
Pune Fraud Racket, Busted, Five Arrested, Cheating Citizens, Sending Money, Hong Kong, Cryptocurrency, cyber police, fraud in pune,
पिंपरी : क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणुकीचे रॅकेट हाँगकाँगमधून; पैसे मोजण्याच्या मशीनसह सात लाख रुपये जप्त
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

नव्या स्मार्टफोनमध्ये का नसतो रिमुव्हेबल बॅटरीचा पर्याय? जाणून घ्या या मागचं कारण

काही दिवसांपूर्वी, व्हॉट्सअ‍ॅप ‘डिलीट मेसेज फॉर एव्हरीवन’ फीचरची वेळ मर्यादा वाढवण्याच्या शक्यतेवर काम करत होते. सध्या, वापरकर्त्यांकडे एकदा पाठवलेला संदेश फक्त एक तास, आठ मिनिटे आणि सोळा सेकंदांपर्यंत डिलीट करण्याचा पर्याय आहे. परंतु व्हॉट्सअ‍ॅप फीचर्स ट्रॅकर Wabetainfoने दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या अपडेटमध्ये वापरकर्त्यांना मेसेज पाठवल्यानंतर सात ते आठ दिवसांपर्यंत डिलीट करण्याचा पर्याय मिळेल.