स्मार्टफोन हा आपल्या सर्वांची प्रमुख गरज बनला आहे. या एका लहानशा डिव्हाइसवरून आपण कितीतरी कामे वेगाने करत आहोत. आपण रोज भरपूर वेळ स्मार्टफोनवर अ‍ॅक्टिव्ह असतो. ऑफिसचे काम असेल नाहीतर इतर वेळी आपण सोशल मीडिया वापरण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करत असतो. स्मार्टफोन आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला आहे.

स्मार्टफोन कंपन्या लोकांच्या गरजेनुसार आपल्या फोनमध्ये सुधारणा करत असतात. या नवीन सुधारणा म्हणजेच अपडेटसह ते आपले नवीन डिव्हाईस बाजारात लॉन्च देखील करत असतात. यावर्षी बार्सिलोनामध्ये सर्वात मोठा मोबाईल शो (MWC )होणार आहे.

infosys profit rs 7969 crore in fourth quarter
इन्फोसिसचा तिमाही नफा ७,९६९ कोटींवर; मार्चअखेर तिमाहीत ३० टक्क्यांची दमदार वाढ
TCS Announces 9 percent Rise, Q4 Net Profit, Rs 12 thousand 434 Crore, Declares Final Dividend, Rs 28 per Share, tata consultancy services, finance article, finance news, share market, stock market,
टीसीएसला १२,४३४ कोटींचा नफा; तिमाहीगणिक ९.१ टक्के वाढ
Next gen Maruti Suzuki Dzire
मारुतीचा नाद करायचा नाय! देशात आणतेय ‘ही’ नवी हायब्रिड कार, कधी होणार भारतात दाखल?
A decrease in the supply of new houses was recorded in eight metros of the country print news
नवीन घरांच्या पुरवठ्यात घट, यंदा पहिल्या तिमाहीत ६९ हजारांवर; गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के कमी

हेही वाचा : स्मार्टफोनच्या Brightness मुळे केवळ डोळेच नाही तर मेंदूवरही होतो परिणाम, जाणून घ्या सोप्पा उपाय

या वर्षीचा सर्वात मोठा मोबाईल शो २७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. २७ फेब्रुवारी ते २ मार्च असा हा सो होणार आहे. या मोबाईल शोमध्ये मोठमोठ्या स्मार्टफोन कंपन्या त्यांचे नवीन मॉडेल्स लोकांसमोर ठेवणार आहेत आणि नवीन टेक्नॉलॉजीची माहिती देणार आहेत. या वर्षीचा सर्वात मोठा मोबाईल शो २७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. २७ फेब्रुवारी ते २ मार्च असा हा शो होणार आहे. या मोबाईल शोमध्ये मोठमोठ्या स्मार्टफोन कंपन्या त्यांचे नवीन मॉडेल्स लोकांसमोर ठेवणार आहेत आणि नवीन टेक्नॉलॉजीची माहिती देणार आहेत. MWC च्या अधिकृत वेबसाइटनुसार, या सो मध्ये ८०,००० पेक्षा अधिक लोक सामील होणार आहेत. ज्यामध्ये २०० देशांमधील दोन हजारांपेक्षा जास्त प्रदर्शकांचा समावेश असणार आहे.

शो मध्ये काय बघता येणार ?

या वर्षीच्या सर्वात मोठ्या मोबाईल शो मध्ये स्मार्टफोन उत्पादक कंपन्या सहभागी होणार आहेत. या इव्हेंटमध्ये Samsung आपली नवीन सिरीज S23 प्रदर्शित करणार आहे. या सिरींजमधील स्मार्टफोनला Snapdragon 8th Generation to SoC चा सपोर्ट देण्यात आला आहे.तसेच या शो मध्ये Xiaomi आपला नवीन Dynamic Island Xiaomi 13 हा स्मार्टफोन लॉन्च करू शकते. याशिवाय Xiaomi MWC मध्ये Xiaomi 13 Lite देखील लॉन्च करणार आहे. डायनॅमिक आयलंड हे फिचर सध्या iPhone 14 Pro Max मध्ये वापरकर्त्यांना मिळत आहे.

हेही वाचा : आजपासून OnePlus च्या ‘या’ स्मार्टफोनच्या प्री-बुकिंगला सुरुवात, मिळणार जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या

Realme कंपनी या मोबाईल शो मध्ये जगातील पहिला २४० वॅटचे चार्जिंग असलेला स्मार्टफोन Realme GT 3 लॉन्च करणार आहे. कंपनीचा हा लॉन्च इव्हेंट तुम्ही ऑनलाईन स्वरूपात पाहू शकणार शकणार आहात.

oneplus कंपनी त्यांचा oneplus ११ कन्सेप्ट फोन MWC मध्ये लॉन्च करणार आहे. याशिवाय नुबिया आपला नुबिया निओव्हिजन ग्लास इव्हेंटमध्ये लॉन्च करेल. ज्यामुळे लोकांना ऑडिओ-व्हिज्युअल अनुभव मिळणार आहे.याशिवाय, कंपनी 3D व्हिज्युअल सपोर्टिंग टॅब (Nubia Pad 3D) देखील सादर करेल जो Asus ProArt Studiobook 16 सारखा असणार आहे.

Honor ही चायनीज स्मार्टफोन कंपनी या शो मध्ये मॅजिक ५ सिरीज लॉन्च करणार आहे. तसेच कंपनी या इव्हेंटमध्ये फोल्डेबल फोन लॉन्च करणार आहे.

जर तुम्हाला MWC २०२३ मध्ये जायचे असेल तर याचे तिकीट तुम्ही MWC च्या वेबसाइटवरून बुक करू शकता. सर्वसाधारण तिकीटाची किंमत ७९९ युरो , लीडर पासची किंमत २,१९६ युरो आणि VIp पासची किंमत ४,४९९ युरो इतकी आहे. ही किंमत संपूर्ण चार दिवसांसाठी असणार आहे.