सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर करत असतो. तसेच काही प्लॅटफॉर्मवरून आपल्याला पैसे देखील कमवता येतात. यामध्ये You Tube हे असे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपले व्हिडीओ , शॉर्ट्स अपलोड करू शकतो. तिथे अनेक चॅनेल्स आपल्याला पाहायला मिळतात. लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, YouTube च्या कम्युनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतातील सुमारे १९ लाखांपेक्षा अधिक व्हिडीओ हटवण्यात आले आहेत. हा आकडा इतर कोणत्याही देशात काढलेल्या व्हिडिओंच्या संख्येपेक्षा जास्त आहे.

याच कालावधीमध्ये युट्युबने जागतिक स्तरावर कम्युनिटी गाइलाईन्सचे उल्लघंन केल्याप्रकरणी ६४ लाख ८० हजार व्हिडीओ हटवले आहेत. युट्युबला मिळालेल्या तक्रारीनुसार, जानेवारी ते मार्च २०२३ दरम्यान भारतात युट्युबच्या कम्युनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन केल्यामुळे १९ लाखांपेक्षा अधिक व्हिडीओ कंपनीने हटवले आहेत. या तुलनेत अमेरिकेमध्ये ६,५४,९६८ तर रशियामध्ये ४,९१,९३३ आणि ब्राझीलमध्ये ४,४९,९३३ व्हिडीओ युट्युबने हटवले आहेत. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : भारतीय युजर्ससाठी Google ने लॉन्च केले AI फिचर, ‘या’ दोन भाषांमध्ये उपलब्ध असणार

”एक कंपनी म्हणून सुरुवातीपासूनच आमच्या कम्युनिटी गाईडलाइन्सनी ययुट्युब वापरकर्त्यांना हानिकारक कंटेंटपासून संरक्षण दिले आहे. आम्ही मशीन लर्निंग आणि मानवी समीक्षक या दोघांच्या मदतीने आमच्या कम्युनिटी गाईडलाईन्स लागू करतो.” असे युट्युब म्हणाले.

युट्युबवर आपण गाणी देखील ऐकत असतो. मात्र आता तुम्हाला गाणे शोधताना गाण्याचे बोल आठवत नसतील तर चिंता करण्याची गरज नाहीये. आता तुम्ही गाण्याची ट्यून गुणगुणत युट्युबवर गाणे शोधू शकणार आहात. युट्युब आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर घेऊन येत आहे. अनेकदा असे होते की आपण एखादे गाणे ऐकतो जे आपल्याला खूप आवडते. मात्र ते आपण आपल्या प्ले लिस्टमध्ये जोडणे विसरतो. त्यामुळे काही दिवसांनी ते गाणे पुन्हा ऐकायचे असते तेव्हा गाण्याचे बोल आठवत नाहीत, फक्त सूर आठवतात. युट्युब अशा स्थितीमध्ये आपल्या वापरकर्त्यांना गाणी शोधण्यासाठी मदत करणार आहे.

Story img Loader