News Flash

डिजीटल कॅमेऱ्यांची बाजारपेठ

स्मार्टफोनच्या भरभराटीमुळे अनेक गॅझेट्सना उतरती कळा आली, हे सत्य नाकारता येत नाही. विशेषत: स्मार्टफोनमधील कॅमेऱ्यांच्या उंचावलेल्या दर्जामुळे कमी मूल्य श्रेणीतील डिजिटल कॅमेऱ्यांचे ग्राहक कमी होत

| May 24, 2014 01:20 am

स्मार्टफोनच्या भरभराटीमुळे अनेक गॅझेट्सना उतरती कळा आली, हे सत्य नाकारता येत नाही. विशेषत: स्मार्टफोनमधील कॅमेऱ्यांच्या उंचावलेल्या दर्जामुळे कमी मूल्य श्रेणीतील डिजिटल कॅमेऱ्यांचे ग्राहक कमी होत चालले आहेत. खास छायाचित्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या डीएसएलआर कॅमेऱ्यांना व्यावसायिकदृष्टय़ा महत्त्व असले तरी त्यांच्या किमती जास्त असल्याने सर्वसामान्य ग्राहक किंवा हौशी छायाचित्रकारांच्या खिशाला ते परवडत नाहीत. मात्र, स्मार्टफोनद्वारे केलेल्या फोटोग्राफीला फोटोचा दर्जा, दूरवरचे फोटो काढणे, सूक्ष्म छायाचित्रण याबाबतीत अनेक मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत मोठे सेन्सर असलेल्या कॅमेऱ्यांनी बाजारपेठेत आपली जागा निर्माण केली आहे. शिवाय डिजिटल कॅमेऱ्यांमध्येही काही उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. हाताळण्यात सोप्या, चांगल्या दर्जाची छायाचित्रे देणारे आणि खिशाला परवडणाऱ्या अशाच काही कॅमेऱ्यांविषयी:

ऑलिम्पस ई पीएल-३
ऑलिम्पसच्या पेन श्रेणीतील हा कॅमेरा डीएसएलआरच्या तोडीची छायाचित्रे काढतो. १२.३ मेगापिक्सेलचा हा लाइव्ह एमओएस सेन्सर असलेला कॅमेरा आहे. याची लेन्स इंटरचेंजेबल म्हणजे काढता येण्यासारखी आहे. त्यामुळे अधिक क्षमतेची लेन्स वापरण्याचे स्वातंत्र्यही तुम्हाला मिळते.
ई-पीएल३ची वैशिष्टय़े
ग् वजनाने हलकी पण मजबूत असलेली ‘मेटल बॉडी’
ग् फोकस आणि शटरच्या वेगवान हालचाली.
ग् ३ इंचांची एलसीडी स्क्रीन
ग् इमेज स्टॅबिलायझेशन म्हणजे फोटो काढताना फोकस स्थिर ठेवणारी यंत्रणा
ग् दर्जेदाज ‘जेपेग’ (खढएॅ) इंजिनमुळे रंग आणि कॉन्ट्रास्टचा योग्य समन्वय
ग् अप्रशिक्षित छायाचित्रकारांनाही वापरण्यास सोपा.
ग् १०८०पी क्षमतेचे एचडी व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची क्षमता.
किंमत २१२४२ रुपये.

सोनी अल्फा एनईएक्स-३एनएल
सोनीच्या मिररलेस डिजिटल कॅमेऱ्यांच्या एनईएक्स श्रेणीतील हा कॅमेरा १६.१ मेगापिक्सेलचा आहे. यामध्ये डीएसएलआर कॅमेऱ्यांत असतो तितक्याच आकाराचा सीएमओएस सेन्सर पुरवण्यात आला आहे.
अल्फा एनईएक्स-३एनएलची वैशिष्टय़े
ग् मोठय़ा क्षमतेच्या सेन्सरमुळे उच्च आयएसओ सेटिंगवरही छायाचित्रांमध्ये नॉइज कमी असतो. त्यामुळे छायाचित्रे सुस्पष्ट येतात. शिवाय अंधारातही काढलेली छायाचित्रे व्यवस्थित येतात.
ग् यासोबत सोनीने सेल्प १६५० कॉम्पॅक्ट लेन्स पुरवली आहे. त्यामुळे झुमिंगवर व्यवस्थित नियंत्रण करता येते.
ग् या कॅमेऱ्याची स्क्रीन १८० अंशात वळवता येते. स्क्रीनचे रेसोल्यूशनही चांगल्या दर्जाचे आहे.
ग् अतिउच्च क्षमतेचा फ्लॅश लाइट
ग् हव्या त्या पद्धतीने छायाचित्रे काढण्यासाठी विविध प्रीसेट्स तसेच ‘पॉइंट अॅण्ड शूट’साठी ऑटो सेटिंग मोड.
किंमत : २५४९० रुपये.

पॅनासॉनिक ल्युमिक्स डीएमसी-जी३
१६.७ मेगापिक्सेलचा सीएमओएस सेन्सर असलेला ल्युमिक्स जी३ हा दूर अंतरावरील छायाचित्रेही दर्जेदारपणे टिपतो. वरील दोन कॅमेऱ्यांच्या तुलनेत आकारात मोठा आणि जाडा असला तरी ल्युमिक्स डीएसएसआर कॅमेऱ्यांपेक्षा हाताळण्यात सोपा आहे.
ल्युमिक्स जी३ची वैशिष्टय़े
ग् हाय रेसोल्यूशनच्या इलेक्ट्रॉनिक व्ह्य़ू फाइंडरमुळे फोटो नेमका कसा दिसेल हे स्क्रीनवर समजते.
ग् बॅटरीचा कमीत कमी वापर.
ग् टच स्क्रीन डिस्प्लेमुळे वापरण्यास सोपा. फोकस हाताळणेही सोपे.
ग् वेगवान आणि अचूक फोकस यंत्रणा.
ग् ३६० अंशात वळणारी एलसीडी स्क्रीन.
किंमत २२९९०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 1:20 am

Web Title: digital cameras available in indian market
Next Stories
1 कोणता कन्सोल घेऊ हाती…
2 तरुणांमध्ये स्मार्टफोनचा वाढता वापर
3 फोनचे व्यसन मोजणारे ‘ब्रेकफ्री’ अॅप
Just Now!
X