आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत थोडसं रिलॅक्स होणे ही गरज असते. यात आपण टीव्ही पाहण्यापासून पुस्तक वाचनापर्यंत अनेक गोष्टी करत असतो. आपला क्षीण घालवण्यासाठी आणखी एक चांगला उपाय म्हणजे गेम्स खेळणे. बहुतांश लोक मोबाइलवर गेम्स खेळून आपला विरंगुळा करत असतात. पण त्याला खूप माय दा येतात. एखाद्या खेळात आपण प्रत्यक्ष सहभागी आहोत असा भास देणारे गेम्स खेळण्यात काही वेगळीच मज्जा असते. व्हिडीओ गेम्सचे विविध पया य देणारे गेमिंग कन्सोल्स बाजारात उपलब्ध आहेत. यातील काही गेमिंग कन्सोल विषयी आपण जाणून घेऊयात.

सोनी प्लेस्टेशन ४
प्लेस्टेशन ४ गेमर्समध्ये अगदी लोकप्रिय  गेमिंग कन्सोल असून ते पीएस४ या नावाने ओळखले जाते. या कन्सोलच्या माध्यमातून आपण अनेक गेम्स खेळू शकतो. फिफा ऑनलाइन या गेममध्ये किंवा बॅडिमटन या गेममध्ये आपण प्रत्यक्ष हाताच्या आणि पायाच्या हालचाली करून स्क्रीनवरील गेम खेळण्याचा अनोखा अनुभव या कन्सोलच्या माध्यमातून आपल्याला घेता येतो.
कन्सोलची वैशिष्टय़े
आठ जीबी जीडीडीआर ५ मेमरी
सिंगल चिप ८६-६४ एएमडी जगौर प्रोसेसर आणि ८ कोर सीपीयू
१.८४ टीएफलोप्स, एमएमडी रिडोनआधारित जीपीयू
५०० जीबी हार्ड डिस्क स्टोअरेज
६एक्स ब्लू रे ड्राइव्ह आणि ८एक्स डीव्हीडी रीड ओन्ली
दोन ३.० यूएसबी, एक एचडीएमआय आऊट, एक एयूएक्स, एक इथरनेट पोर्ट
वायफाय, ब्लू ट्यूथ २.१ ईडीआर
किंमत – ३९,९९० रुपये.

मिताशी गेम इन स्मार्ट कव्र्ह
जर तुम्हाला टीव्ही व्हिडीओ गेम नको असेल तर हातात घेऊन गेम्सची मज्जा घेता येणारे वेगळे उपकरणही मिताशीने बाजारात आणले आहे. या उपकरणात २५० अंतर्गत गेम्स देण्यात आले आहे. लहान मुलांना हाताळता यावे या दृष्टीने हा कन्सोलच्या टोकांना अर्धगोल देण्यात आला आहे. हा कन्सोल १६ बीट गेम्सना सपोर्ट करतो. याची स्क्रीन २.५ इंचांची आहे. यामध्ये अंतर्गत स्पीकर्स देण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर हा कन्सोल आपण टीव्हीला जोडून यातील गेम्स टीव्हीच्या स्क्रीनवर पाहूनही खेळू शकतो.
किंमत – १,९९९ रुपये.

सोनी प्ले स्टेशन विस्टा
प्ले स्टेशन विस्टा हा गेिमग कन्सोल पीएस विस्टा या नावाने लोकप्रिय आहे. हा कन्सोल हातात घेऊन गेम्स खेळता येतात. थोडक्यात हा कन्सोल म्हणजे जुन्या व्हिडीओ गेम्सची आधुनिक आवृत्ती म्हणता येईल.
कन्सोलची वैशिष्टय़े
हा कन्सोल १८२.० बाय १८.६ बाय ८३.५  एमएम डायमेन्सचा आहे.
स्क्रीन पाच इंचांची टचस्क्रीन आहे. शिवाय याला मल्टी टचपॅटही देण्यात आला आहे, ज्याचा वापर एकापेक्षा अनेक जणांना खेळण्यासाठी करता येऊ शकतो.
एआरएम कॉरटेक्स ए९ कोर सीपीयू
एसजीएक्स ४३ एमपी४ जीपीयू
५१२ एमबी रॅम आणि १२८ एमबी व्हच्र्युअल रॅम
फ्रंट आणि रेअर कॅमेरा
अंतर्गत स्पीकर आणि मायक्रोफोन
थ्रीजी आणि वायफाय मॉडेलमध्ये जीपीएस सुविधा
पीएस विस्टा कार्ड स्लॉट, मेमरी कार्ड स्लॉट, सिम कार्ड स्लॉट
२२१० अॅम्पिअरची लिथियम बॅटरी
गाणी, व्हिडीओ आणि फोटोंची सुविधा
किंमत – १६,९९० रुपये.

मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्स ३६०
सोनी प्लेस्टेशन आणि मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्स यांच्यात तुंबळ युद्ध नेहमीच रंगते. एकमेकांना तोडीस तोड असे ठरणारे हे दोन्ही कन्सोल्स बाजारात सर्वाधिक मागणी असणाऱ्यांपकी आहेत.
कन्सोलची वैशिष्टय़े
अंतर्गत वाय-फाय सुविधा
किनेक्ट सेन्सर
वायरलेस नियंत्रक
कोर३ आयबीएम एक्सीनॉन सीपीयू
५१२ एमबी रॅम आणि १० एमबी ईडीरॅम
२०, ६०, १२०, २५० आणि ३२० जीबी हार्ड डिस्क स्टोअरेजच्या पर्यायांमध्ये उपलब्ध.
किंमत – चार जीबीचा कन्सोल १५,९९० रुपयांना उपलब्ध, तर २५० जीबी कन्सोल २४,९९० रुपयांना उपलब्ध.

नीन्टेन्डो वी
सोनी आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या गेिमग कन्सोलला पर्याय म्हणून नीन्टेन्डो वी या कन्सोलकडे पाहिले जाते. या कन्सोलमध्येही आपल्याला चांगल्या दर्जाच्या गेिमगचा अनुभव घेता येतो. यामुळे या कन्सोललाही भारतीय बाजारात सध्या चांगली मागणी आहे.
कन्सोलची वैशिष्टय़े
हा कन्सोल १.७५ बाय ६ बाय ८.५ इंचांच्या डायमेन्सचा आहे.
याचे वजन सुमारे पाच किलो आहे.
यामध्ये पॉवर पीसी प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
याचा जीपीयू आर्टििफशिअल इंटलिजन्सनी तयार करण्यात आला आहे.
यामध्ये ५१२ एमबीची अंतर्गत फ्लॅश मेमरी देण्यात आली आहे.
याला दोन यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत. अंतर्गत वायरलेस किंवा वायर्ड ब्रॉडबँड इंटरनेटची सुविधा देण्यात आली आहे.
नीन्टेंडो गेम क्यूब मेमरी कार्ड स्लॉटही यात देण्यात आला आहे.
किंमत – १५,५०० रुपये.

सोनी प्लेस्टेशन ३
प्लेस्टेशन ३ हा कन्सोलही भारतीय गेमर्समध्ये अगदी लोकप्रिय आहे. हे कन्सोल पीएस३ या नावाने ओळखले जाते. या कन्सोलच्या माध्यमातून आपण अनेक गेम्स खेळू शकतो.
कन्सोलची वैशिष्टय़े
सेल ब्रॉडब्रँड इंजिन सीपीयू
आरएसएक्स जीपीयू
२५६ एमबी एक्सडीआर मुख्य रॅम, २५६ एमबी जीडीआर३ व्हच्र्युअल रॅम
१२ जीबी आणि ५०० जीबी या दोन स्टोअरेज प्रकारात बाजारात उपलब्ध
दोन ३.० यूएसबी, एक एचडीएमआय आऊट, एक इथरनेट पोर्ट
वायफाय, ब्लू ट्यूथ २.० ईडीआर
एक एव्ही मल्टी आऊट कनेक्टर
एक डिजिटल आऊट ऑप्शनल कनेक्टर
कॅन रीड २एक्स बीडी-रोम, ८एक्स डीव्हीडी-रोम आणि २४एक्स सीडी रोम
किंमत -१२ जीबी १६,९९० रुपये आणि ५०० जीबी २२,९९० रुपये.

मिताशी गेम इन चॅम्प
पूर्वीच्या जुन्या पद्धतीचे टीव्ही व्हिडीओ गेम्स हवे असतील तर स्वस्तामध्ये मिताशीच्या गेम इन चॅम्पचा पर्याय बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये एक कॅसेट रीडर देण्यात आला असून दोन जॉयस्टिक देण्यात येतात. म्हणजे एका वेळी दोन जण कोणताही गेम एन्जॉय करू शकता. हा कन्सोल ८ बीट गेम कार्टरेजला सपोर्ट करतो.
किंमत – ८९९ रुपये.