प्रश्न – माझे जीमेल अकाऊंटचा कोटा संपला आहे. त्यातील मेल्स महत्त्वाचे असल्यामुळे सगळे मेल्स डीलीट करता येणे शक्य नाही, तर हा बॅकअप कसा घ्यायचे ते सांगावे.     
– सुरक्षा देठे
उत्तर- जीमेल अकाऊंटमध्ये १५ जीबीपर्यंतची साठवणूक क्षमता मोफत दिली जाते. यावर जर तुम्हाला साठवणूक क्षमता हवी असेल तर तुम्हाला ती विकत घ्यावी लागते. जर तुम्हाला ती विकत घ्यायची नसेल तर तुम्ही दुसरा ई-मेल आयडी सुरू करावा. या ई-मेल आयडीवर तुम्ही तुमच्या मेल्सचा बॅकअप घेऊ शकतात. एकदा ई-मेल आयडी सुरू झाली की पुन्हा जुने ई-मेल अकाऊंट सुरू करा. यामध्ये सेटिंगमध्ये फॉरवर्डिग आणि पीओपी/आयमॅप या पर्यायामध्ये जा. तेथे तुमचे नवीन अकाऊंट अ‍ॅड करा. त्यानंतर सेव्ह चेंजेस करून मग नवीन ई-मेल पुन्हा सुरू करा. त्याच्या सेटिंगमध्ये जाऊन अकाऊंट अ‍ॅण्ड इम्पोर्टमध्ये ‘अ‍ॅड ए पीओपी३ मेल अकाऊंट युवर ओन’ हा पर्याय स्वीकारा. त्यानंतर येणारे सेटिंग करत जाऊन पुढे तुम्ही ई-मेल इम्पोर्ट केल्यावर तुमचे मेल्स नवीन मेल आयडीवर येतील.  
प्रश्न – मोबाइल स्लो होतो काय करू?     
– देवेश महाले
उत्तर – अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल स्लो होणे हे तसे नवीन नाही. यासाठी तुम्ही मोबाइलमध्ये अधिकृत अँटिव्हायरस जर वापरला तर ते अधिक उपयुक्त ठरेल. याशिवाय मोबाइलच्या टास्क मॅनेजरमध्ये जाऊन नियमित अ‍ॅप्स बंद करत जावे तसे रॅमही क्लिअर करत जावीत. अ‍ॅप मॅनेजरमध्ये जाऊन प्रत्येक अ‍ॅपचे कॅशेज क्लिअर करावे जेणेकरून तुमचा फोनमधील नको असलेल्या गोष्टी निघून जातील आणि तुमच्या फोनचा वेग वाढू शकेल.
तंत्रस्वामी
या सदरासाठी प्रश्न lstechit@gmail.com या मेल आयडीवर पाठवा.

loksatta news , loksatta, marathi news, marathi