News Flash

मोबाइलची सुरक्षा

स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांची संख्या ज्या प्रमाणात वाढतेय त्या प्रमाणात स्मार्टफोनची यंत्रणा बिघडवण्यासाठी अनेक व्हायरसेसही बाजारात येऊ लागले आहेत.

| November 22, 2013 08:07 am

स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांची संख्या ज्या प्रमाणात वाढतेय त्या प्रमाणात स्मार्टफोनची यंत्रणा बिघडवण्यासाठी अनेक व्हायरसेसही बाजारात येऊ लागले आहेत. हे व्हायरसेस आपल्या फोनची खूप हानी करू शकतात. यामुळे यांच्यापासून जपून राहणे हे आपल्याला केव्हाही चांगले. विशेषत: एकमेकांकडून माहितीची देवाण-घेवाण करताना, वाय-फाय नेटवर्कचा वापर करताना हा व्हायरसचा धोका अधिक असतो. यामुळे मोबाइलची काळजी घेणे हे महत्त्वाचे झाले आहे. मोबाइलमध्ये कोणते अ‍ॅण्टीव्हायरस तुम्ही टाकू शकता, याची माहिती आपण जाणून घेऊया.

कॅस्पर्सस्काय
हा अ‍ॅण्टीव्हायरस कॉम्प्युटरसाठी तर प्रसिद्ध आहेच पण मोबाइलसाठीही तितकाच उपयोगी आहे. ‘कॅस्पर्सस्काय मोबाइल सिक्युरिटी १४’ हे त्याचं लेटेस्ट व्हर्जन आहे. हा अ‍ॅण्टीव्हायरस तुमच्या स्मार्टफोनची फोन मेमरी, मेमरी कार्ड पूर्णपणे स्कॅन करतो. मालवेअर्स, व्हायरस फाइल डिलिट करण्यास मदत करतो. यामुळे तुमच्या स्मार्टफोनमधील डेटा व्हायरसपासून सुरक्षित राहतो. या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला ब्लॅकलिस्टची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही नको असलेल्या नंबरवरून येणारे कॉल्स आणि एसएमएस ब्लॉक करू शकता.
प्रायव्हेट प्रोटेक्शन हे कॅस्पर्सस्काय मोबाइल सिक्युरिटी १४ मधील प्रमुख वैशिष्टय़. यामुळे तुम्हाला हवे असलेले कॉन्टॅक्ट्स, एसएमएस, कॉल लॉग्स इतरांपासून लपवू शकता. या अ‍ॅण्टी व्हायरसमधील थेट प्रोटेक्शनमुळे तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तरी एका एसएमएसद्वारे तुम्हाला त्यात नव्याने घातलेल्या सिम कार्डची माहिती मिळू शकते. गुगल मॅप्स आणि जीपीएसच्या माध्यमातून तुम्ही चोरीला गेलेल्या फोनचं लोकेशन शोधू शकता. ३० दिवसांचे ट्रायल व्हर्जन संपल्यावर तारीख बदलून हे सॉफ्टवेअर वापरू नका त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम क्रॅश होऊ शकते. ट्रायल व्हर्जननंतर हे सॉफ्टवेअर वापरायचे असेल तर वर्षभराचे लायसन्स व्हर्जन घेणंच बरं. कॅस्पर्सस्काय मोबाइल सिक्युरिटी हा अ‍ॅण्टीव्हायरस अ‍ॅण्ड्रॉइड, िवडोज स्मार्टफोन्ससाठी उपलब्ध आहे.

ईएसईटी
तुमचा स्मार्टफोन व्हायरस, स्पॅम, फायरवॉल यापासून सुरक्षित ठेवण्याचे काम ईएसईटी करतो. यामध्ये फायरवॉल प्रोटेक्शन, स्पॅम फिल्टर, अ‍ॅण्टी थेफ्ट असे फिचर्स आहेत. िवडोज आणि सिम्बियन फोन्ससाठी तो जास्त चांगला आहे. त्यात ब्लॅकलिस्ट व व्हाइट लिस्ट असे ऑप्शन आहेत. ब्लॅकलिस्टमध्ये नको असलेल्या नंबर्सचे कॉल्स किंवा मेसेजेस ब्लॉक करता येतात. व्हाइट लिस्टमध्ये तुम्ही विश्वासातील माणसांचे कॉन्टॅक्ट्स अ‍ॅड करू शकता. त्यामुळे फोन चोरीला गेला किंवा त्यातील सिमकार्ड बदलल्यास, लोकेशनसहित सर्व डिटेल्स व्हाइट लिस्टमधील नंबर्सवर एसएमएसद्वारे मिळतात. यामध्ये इनबिल्ट टास्कमॅनेजर आहे ज्यामध्ये तुम्ही रिनग अ‍ॅप्स, फोनमधील फ्री स्पेस, फोनची बॅटरी लाइफ इ. गोष्टी पाहू शकता. हा डिव्हाइस तुम्हाला पासवर्ड प्रोटेक्टेड ठेवता येतो. यामुळे तुम्ही सिक्युर वेब ब्राऊिझग करू शकता. डाऊनलोडिंगमध्ये संशयास्पद फाइल्स दिसल्या तर हा अ‍ॅण्टीव्हायरस लगेचच त्या डिलिट करतो. या फोनचे ट्रायल व्हर्जन ३० दिवसांचे असते, त्यानंतर वापरायचे असल्यास लायसन्स वर्जन तुम्हाला विकत घ्यावे लागेल. तुमचा चोरलेला किंवा हरवलेला डिव्हाइस शोधण्याच्या बाबतीत मात्र या अ‍ॅण्टीव्हायरसला काही मर्यादा येतात.

अवास्त
अवास्त ही अ‍ॅण्टीव्हायरसची चांगली कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीचाही मोबाइल अ‍ॅण्टीव्हायरस असून यामध्ये आपण विविध प्रकरची माहिती स्कॅन करू शकतो. यामध्ये आपल्याला व्हायरस स्कॅनर, प्रायव्हसी अ‍ॅडव्हायजर, अ‍ॅप्लिकेशन मॅनेजमेंट, शिल्ड कंट्रोल, एसएमएस अँड कॉल फिल्टर, फायरवॉल, नेटवर्क मीटर अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये आपण एखादी साइट ब्लॉक करण्यापासून अनेक सुरक्षेच्या गोष्टी पूर्ण करून ठेवू शकतो. आपण माहितीची देवाण घेवाण करताना कोणत्याही प्रकारचा व्हायरस त्यामध्ये असेल तर आपल्याला हा अँटिव्हायरस वेळीच सूचित करतो. मग आपण ती माहिती घ्यायची की नाही हा आपला प्रश्न असतो. इतकेच नव्हे तर ती माहिती स्कॅन करण्याची सुविधाही यामध्ये आहे. यामुळे आपण आलेली माहिती स्कॅनिंग करून घेऊन त्यातील व्हायरस काढून टाकला जातो.

वेबरूट
सध्या चलती असलेल्या अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्टफोन्ससाठी हे वेबरूट मोबाइल सिक्युरिटी अ‍ॅण्टी व्हायरस सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. इन बिल्ट अ‍ॅप्लिकेशन स्कॅनर हे याचं खास वैशिष्टय़. अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड केल्या जाणाऱ्या अ‍ॅप्समधून येणाऱ्या धोकादायक व्हायरस आणि मालवेअर्स फाइल्स हा डिलिट करतो. इन बिल्ट अ‍ॅप्स स्कॅनरमुळे तुम्ही थर्ड पार्टी सॉफ्टवेअर्स डाऊनलोड केले तरी ते ऑटोमॅटिकली स्कॅन होतात. एखाद्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये व्हायरस फाइल असल्यास वेबरूट त्याचं इन्स्टॉलेशन रिजेक्ट करतो. त्यामार्फत येणाऱ्या फाइल्स ब्लॉक करतो. कॉल आणि एसएमएस ब्लॉकिंगची सुविधाही यामध्ये आहे. सिक्युअर वेब ब्राऊिझग हे वेबरूटमधील महत्त्वाचे वैशिष्टय़. ज्यामध्ये तुम्ही वेब पेज ओपन केल्यावर वेब िलक्स, यूआरएल िलक्स धोकादायक असतील तर ते वेबपेज आधीच ब्लॉक होतं. वेबरूटच्या पेड व्हर्जनमध्ये तुम्हाला डिव्हाइस लॉक, वाइप डेटा, डिव्हाइस स्कीम या फीचर्सचा अनुभव घेता येईल. जर तुमचा फोन कोणी चोरला तर डिव्हाइस लॉकमुळे सिम कार्ड बदलल्यावर आपोआपच तुमचा फोन लॉक होईल. वाइप डेटामध्ये तुमच्या चोरीला गेलेल्या या फोनमधली पर्सनल माहिती ऑॅनलाइन डिलिट करू शकता. डिव्हाइस स्कीम अलर्ट इनेबल असेल तर तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवल्यास गुगल मॅप्सच्या सहाय्याने वेबरूट तुमच्या फोनची लोकेशन सर्च करू शकतो. हा अ‍ॅण्टीव्हायरस अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्टफोन्ससाठी बेस्ट आहे, परंतु तो इतर कोणत्याच स्मार्टफोन्ससाठी उपलब्ध नाही.

मॅकेफी
अ‍ॅण्टीव्हायरससाठी प्रसिद्ध असलेल्या कंपन्यांमध्ये ‘मॅकेफी’चा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. स्मार्टफोनमध्ये व्हायरस, स्पायवेअर्स, मालवेअर्सपासून तुमचा डेटा प्रोटेक्ट करण्याचे काम मॅकेफी करतो. ‘साईट अ‍ॅडवायजर’ हे यातील महत्त्वाचं वैशिष्टय़ं. ज्यामुळे तुम्ही सुरक्षितरीत्या नेट सर्फिग आणि ऑनलाइन शॉिपग करू शकता. तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर हा अ‍ॅण्टीव्हायरस तुमचा डेटा प्रोटेक्ट करतो. यामधील सेफगार्डमुळे स्पायवेअर्स, मालवेअर्सपासून तुमचा फोन सुरक्षित राहतो. तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तरी गुगल मॅप्स आणि जीपीएसच्या सहाय्याने मॅकेफी तुमच्या डिव्हाइसची लोकेशन ट्रेस करू शकतो, तसंच त्यातील बदललेल्या सिम आणि त्यामधून केल्या जाणाऱ्या कॉल्सची माहिती देऊ शकते. याच्या सहाय्याने तुम्ही हवा तिथे डेटा बॅकअप घेऊन कुठेही अ‍ॅक्सेस करू शकता तसेच तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर त्यावरील डेटा तुम्ही नवीन फोनवर रिस्टोअर करू शकता. हा अ‍ॅण्टीव्हायरस सोशल नेटवर्किंग साइट्स, ईमेल, एसएमएस, एमएमएसमधून येणाऱ्या धोकादायक िलक ब्लॉक करतो. याचे ट्रायल वर्जन सात दिवसांचे असते. त्यानंतर जर तुम्हाला तो वापरायचा असेल तर लायसन्स व्हर्जन विकत घ्यावं लागेल. काहीवेळा या अ‍ॅण्टीव्हायरसमुळे तुमचा स्मार्टफोन थोडा स्लो होतो. अ‍ॅण्ड्रॉइड, िवडोज, सिम्बियन, ब्लॅकबेरी स्मार्टफोन्ससाठी तुम्ही तो वापरू शकता.

नेटक्वीन मोबाइल सिक्युरिटी
हा मोबाइलसाठी वापरला जाणारा हा प्रचलित अ‍ॅण्टीव्हायरस आहे. तुमचा पूर्ण फोन जलद स्कॅन करण्यास हा मदत करतो. ऑटोमॅटिकली व्हायरस डेटाबेस अपडेट करणे, लॉस्ट फोन लोकेशन, प्रायव्हसी प्रोटेक्शन, ट्रॅफिक मॅनेजर, सिस्टम ऑप्टीमायझर, कॉन्टॅक्ट्स बॅक अप ही या मोबाइल सिक्युरिटीची वैशिष्टय़ं आहेत. सध्या यामध्ये नेटक्वीन मोबाइल सिक्युरिटी ७.६ हे लेटेस्ट व्हर्जन आहे. स्मार्टफोनमध्ये व्हायरस, मालवेअर्स, फोन हॅकर्सपासून तुमचा डाटा सेफ ठेवण्याचे काम हा करतो. त्यातील ट्रॅफिक मॅनेजरमुळे तुम्हाला महिन्याभरात वापरलेल्या डेटाचे प्रमाण कळू शकते, तो हॅकर्सना ब्लॉक करतो. प्रायव्हसी प्रोटेक्शन, फोन लोकेटर, सिक्युअर डेटा ब्राउिझग हे फीचर्सदेखील नेटक्वीनमध्ये आहेत. तुम्ही कॉन्टॅक्ट्सचा एसडी कार्डवर बॅकअप घेऊ शकता. यामधील अ‍ॅन्टी लॉस्ट फिचरमध्ये साऊंड अलार्मची सुविधाही उपलब्ध आहे. तसंच हे फीचर तुमच्या हरवलेल्या फोनची लोकेशनसुद्धा ट्रेस करू शकते. अगदी सहजरीत्या वापरता येण्यासारखे हे सॉफ्टवेअर आहे. याचं ट्रायल व्हर्जन ३० दिवसांचे असते, त्यानंतर तुम्हाला ते रजिस्टर करावे लागते. पण यामध्ये ऑनलाइन डेटा बॅकअप घेण्याची सुविधा नाही. अ‍ॅण्ड्रॉइड, िवडोज, सिम्बियन, ब्लॅकबेरी स्मार्टफोन्समध्ये हे सॉफ्टवेअर सपोर्टेबल आहे.

बुल गार्ड
हा अ‍ॅण्टीव्हायरस प्रामुख्याने पॅरेन्टल कंट्रोलसाठी प्रसिद्ध आहे. त्याशिवाय त्यात कॉल्स आणि मेसेजेस ब्लॉक, वाइप डेटा, अ‍ॅण्टी थेफ्ट यासारखे फिचर्स आहेत. तुमची मुले त्यांच्या फोनवरून इंटरनेटवर काय काय करतात हे तुम्ही या सॉफ्टवेअरद्वारे पाहू शकता. पण त्यासाठी या अ‍ॅण्टीव्हायरसच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अकाउंट ओपन करा वं लागतं. बुल गार्ड मोबाइल सिक्युरिटी तुमचा फोन नियमित आणि ऑटोमॅटिक स्कॅन करतो. यामध्ये अ‍ॅडव्हान्स व्हायरस प्रोटेक्टर आहे. हा अ‍ॅण्टीव्हायरस तुमच्या हरवलेल्या फोनचं लोकेशन शोधतो. तुमच्या ऑनलाइन अकाउंटवरून कधीही कॉन्टॅक्ट्स, एसएमएस, कॅलेण्डर एन्ट्रीजचा बॅकअप घेऊ शकता. फायरवॉल प्रोटेक्शन, स्पॅम फिल्टर हे फीचर्ससुद्धा या अ‍ॅण्टीव्हायरसमध्ये आहेत. याचं ट्रायल व्हर्जन १५ दिवसांचे असते. ते संपल्यानंतर ते रीइन्स्टॉल करून वाढवता येत नाही. या अ‍ॅण्टीव्हायरसची किंमत थोडी जास्त असते. हे सॉफ्टवेअर सिम्बियन, िवडोज, अ‍ॅण्ड्रॉइडसाठी उपलब्ध आहे, परंतु सर्वच सिम्बियन, िवडोज, अ‍ॅण्ड्रॉइड डिव्हाइसमध्ये हा अ‍ॅण्टीव्हायरस सपोर्टेबल नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 8:07 am

Web Title: mobile security
टॅग : Tech It
Next Stories
1 गुगलच्या नेक्सस ५
2 गुगलचे टाग्रेट महिला
3 टॅबचा जोडीदार
Just Now!
X