News Flash

गेमस्थ

गेम्स खेळण्यात रमणे हे कुणाला आवडत नाही? कामाचा, अभ्यासाचा वा आणखी कुठला ताण वाटला की थोडे विश्रांत होण्यासाठी मोबाइलवर किंवा अगदी संगणकावर गेम खेळणे कुणीही

| December 13, 2013 06:37 am

गेमस्थ

गेम्स खेळण्यात रमणे हे कुणाला आवडत नाही? कामाचा, अभ्यासाचा वा आणखी कुठला ताण वाटला की थोडे विश्रांत होण्यासाठी मोबाइलवर किंवा अगदी संगणकावर गेम खेळणे कुणीही टाळत नाही. यामुळे सध्या बाजारात असलेल्या व नव्या वर्षांत बाजारात येणार असलेल्या गेम्सविषयी आपण माहिती करून घेऊयात.
ग्रान टुरिझ्मो ६
सोनी प्ले स्टेशनने नुकतेच भारतात लाँच केलेल्या ‘ग्रान टुरिझ्मो ६’ या गेमिंग कन्सोलमध्ये आपल्याला भरपूर नवनवे गेम्स मिळणार आहेत. हे सर्व गेम वेगवान आहेत. यामध्ये आपल्याला १२०० हून अधिक गाडय़ा असलेल्या कार रेसिंग चॅम्पियनशिप गेम खेळता येणार आहे. यामध्ये देण्यात आलेली ‘लुनार रोवर व्हेइकल’ जर तुम्ही अनलॉक केली, तर तुम्हाला परग्रहावरील वातावरणाचा अनुभव देणारी स्क्रीन उपलब्ध होईल. इतकेच नव्हे, तर तुम्हाला अनोखी रेसही खेळता येणार आहे. याशिवाय या माध्यमातून आपल्याला ऑनलाइन गेमिंगमध्येही सहभागी होता येणार आहे. यामध्ये वापरण्यात आलेले नवे तंत्रज्ञान हे या कन्सोलची खासियत असणार आहे. याशिवाय २०१०मधील रेड बुल एक्स सीरिज या कन्सोलमध्ये आपल्याला नव्याने खेळता येणार आहे. रेडबुल एक्स २०१४ ही आवृत्ती यासाठी बाजारात आणली आहे.

बायोशॉक इन्फिनिट
कोलंबिया शहरात हीरोला एक मुलगी सापडते आणि तिच्यावरून सुरू होणारी कहाणी या गेममध्ये विविध टप्प्यांमध्ये रंगवण्यात आली आहे. यामधील हीरो आपण असलो तरी यात येणाऱ्या अडचणींवर मात करत तिची सुटका करून आपल्या ताब्यात आणणे खूप जिकिरीचे काम आहे. यामध्ये आपल्याला केवळ मज्जाच करता येते असे नाही, तर बुद्धीचाही वापर करावा लागतो. समोरून अनपेक्षितपणे येणारी आव्हाने स्वीकारण्यासाठी सज्ज राहावे लागते. जर तुम्हाला गोष्टी ऐकायला किंवा सांगायला आवडत असेल, तर नक्कीच तुम्ही हा गेम एन्जॉय करू शकता. यामध्ये याच संकल्पनेवर आधारित विविध गेम्स देण्यात आले आहेत. यामध्ये देण्यात आलेली कथा खरोखरीच प्रोत्साहन देणारीही आहे.

कंपनी ऑफ हीरोज
दुसऱ्या महायुद्धावर अनेक संगणकीय गेम्स आले आहेत, पण यातील हा गेम म्हणजे सर्वात लोकप्रिय आहे. हा गेम प्रत्यक्षात २००६ मध्ये बाजारात आला. तरी त्याच्या प्रत्येक आवृत्तीने बाजारात लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. या गेममध्ये भरपूर पात्र असून शत्रुपक्षाचा खात्मा करण्यासाठी आपल्याला कधी बुद्धीचा, तर कधी बळाचा वापर करावा लागतो. योजनाबद्ध आक्रमणाची आखणी करण्याची यामध्ये गरज असून ही करण्यासाठी आपल्याला यात काही क्लू देण्यात आले आहेत. त्याचा वापर करून योग्य आखणी करणे आणि शत्रुपक्षाचा नियोजित वेळेत खात्मा करण्याचे आव्हान आपल्याला पेलायचे असते. यामध्ये वापरण्यात आलेले ग्राफिक्स आणि त्याचा आवाज हे अत्याधुनिक असून त्याचा प्रभाव गेम खेळताना खूप चांगल्या प्रकारे पडत असतो.
फिफा १४
फुटबॉलचा वर्ल्ड कप हा सध्या भारतीय तरुणांचा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. नाक्यावर प्रत्येक जण एक एक फुटबॉलपटूच झाल्यासारखा वावरत असतो आणि चर्चाही करत असतो; पण प्रत्यक्ष मैदानात नाही, पण संगणकीय मैदानात जाऊन खेळण्याची संधी आपल्याला या गेमच्या माध्यमातून मिळू शकते. यात आपण अगदी मेस्सी, रोनाल्डोपासून कुणीही आपला आवडता फुटबॉलपटू होता येते. या गेमचे व्हर्जन आपल्याला नव्या वर्षांत उपलब्ध होणार असून या गेममध्ये आपल्याला खिळवून आणि खेळवत ठेवण्याची चांगलीच क्षमता आहे.

बॅटमन
वॉर्नर ब्रदर्सनी विकसित केलेल्या गेम्सपैकी हा एक गेम आहे. हा गेम विंडोज, पीएस ३, एक्सबॉक्स ३६० वर खेळता येऊ शकतो. या गेममध्ये आपल्याला शत्रूंचा खात्मा करणाऱ्या बॅटमनची भूमिका बजावायची असते. यामुळे आपल्याला हीरो असल्याची भावना निर्माण होऊन आपण हा गेम खूप जास्त एन्जॉय करत असतो. या गेममध्ये काही फारसे वेगळे नसले तरी हा गेम खूप लोकप्रिय आहे. याचे कारण म्हणजे हा गेम खेळताना खूप जास्त मज्जा येत असते. यामध्ये तयार करण्यात आलेली शत्रूंची चाल आणि त्यातून लढणारा बॅटमन आपल्याला गोष्ट सांगतो आणि विचार करायलाही भाग पाडत असतो.

बॅटल फिल्ड ४
तुम्हाला युद्धाच्या खेळांची आवड असेल तर हा गेम खूप जास्त तुम्ही एन्जॉय करू शकतात. यामध्ये केवळ भूदलाशीच युद्ध नसून हे युद्ध वायू तसेच नौसेनेशीही आहे. यामुळे या गेमला एक वेगळे वळण देण्यात आले आहे. हा गेम म्हणजे आपल्याला एन्जॉयमेंटबरोबरच युद्धाच्या वेळी करण्यात येणाऱ्या आखण्यांची माहितीही करून देत असतो. यामध्ये इनबिल्ट देण्यात आलेली माहिती ही खऱ्या युद्धाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या माहितीपैकी आहे. यामध्ये युद्ध करण्यासाठी आपल्याला शहरात, जंगलात, पाण्यात कुठेही जावे लागते. हे सर्व लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले याचे ग्राफिक्स आणि साऊंड खूप चांगल्या प्रकारे विकसित करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2013 6:37 am

Web Title: new games in market
Next Stories
1 सो हो अ‍ॅप्स
2 आटोपशीर सोयीचा टॅब
3 सोशल मेसेजिंगचा तडका