सॅमसंगने आता ‘गॅलेक्सी कोअर’ या नवीन स्मार्टफोनची घोषणा केली आहे. कुठेही नेण्यास सोयीचा व ऊर्जा वाचवणारा अशी या स्मार्टफोनची दोन प्रमुख वैशिष्टय़े आहेत.यात डय़ुअल सिमी तंत्रज्ञानाचा वापरही केलेला आहे. त्याची काही वैशिष्टय़े खालीलप्रमाणे आहेत.
स्क्रीन : ४.३ इंच टीएफटी (विवर्तन ८०० बाय ४८० पिक्सेल)
ऑपरेटिंग सिस्टीम : अँड्रॉइड ४.१ (जेली बिन)
प्रोसेसर : १.२ गिगॅहर्टझ
रॅम : १ जीबी
स्टोरेज : ८ जीबी
विस्तारित स्टोरेज : ६४ जीबी
कनेक्टिव्हिटी : टू जी, थ्री जी, वायफाय व ब्लूटूथ ३.०
यूएसबी : मायक्रो यूएसबी २.०
कॅमेरा : पाच मेगापिक्सेल, एलइडी फ्लॅश (मागच्या बाजूस) व्हीजीए कॅमेरा (पुढच्या बाजूस)
बॅटरी : १८०० एमएएच
वजन : १२४ ग्रॅम
प्रतिस्पर्धी : एचटीसी डिझायर एक्स, सोनी एसपरिया यू, मोटोरोला अ‍ॅट्रिक्स २, नोकिया ल्युमिया ६२०, एलजी ऑप्टिमस एल ७ डय़ुअल