News Flash

स्मार्ट अॅप्स

स्मार्टफोन म्हटले की त्यामध्ये अ‍ॅप्स येणे हे स्वाभाविकच आहे. पण आपल्या मित्रांकडे अमुक अ‍ॅप्स आहेत.

| January 20, 2015 06:32 am

Untitled-1
स्मार्टफोन म्हटले की त्यामध्ये अ‍ॅप्स येणे हे स्वाभाविकच आहे. पण आपल्या मित्रांकडे अमुक अ‍ॅप्स आहेत. यामुळे आपण ते अ‍ॅप्स घ्यायचे याहीपेक्षा आपल्याला उपयुक्त असे अ‍ॅप्स जर आपण घेणार असू तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. अ‍ॅप्सच्या बाजारात अनेक स्मार्ट अ‍ॅप्स उपलब्ध आहेत, ज्याच्यामुळे आपण आपली अनेक कामे अगदी सहजपणे पार पाडू शकतो. पाहू या नव्याने बाजारात आलेली अशी काही अ‍ॅप्स-
Untitled-1टीव्ही रिमोट कंट्रोल प्रो
घराघरांतील टीव्ही आता स्मार्ट होऊ लागले आहेत. पण टीव्हीचा रिमोट कंट्रोल मात्र काही सुटत नाही. या रिमोट कंट्रोलपासून सुटका हवी असेल तर तुम्ही हे अ‍ॅप डाऊनलोड करून टीव्हीच्या रिमोटला रामराम ठोकू शकता. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण आपल्या मोबाइलमधून टीव्हीचा ताबा मिळवू शकतो. यासाठी टीव्हीच्या कोणत्याही प्रकारच्या सेटिंग्जमध्ये बदल करण्याची गरज नसते. टीव्ही सुरू केला की हे अ‍ॅप सुरू करायचे आणि टीव्हीवर नियंत्रण मिळवायचे. या अ‍ॅपमध्ये टीव्हीच्या रिमोटमध्ये असलेले सर्व पर्याय देण्यात आले आहेत. यामुळे कोणत्याही वेळी आपल्याला अ‍ॅपपेक्षा रिमोट बरे असे वाटत नाही. हे अ‍ॅप अँड्रॉइडच्या २.३ या व्हर्जनपासून पुढच्या व्हर्जनमध्ये काम करू शकते. हे अ‍ॅप शेकडो प्रकारच्या टीव्हीसाठी काम करते. पण जर तुमच्या टीव्हीसाठी करत नसेल तर तुम्ही अ‍ॅप विकासकाला ई-मेल लिहिला तर तो पुढच्या व्हर्जनमध्ये त्याची तरतूद करू शकेल असे विकासकाने अँड्रॉइड प्ले स्टोअरवर नमूद केले आहे. तेथेच ई-मेल आयडीही दिला आहे.
रूम्स टू नाइट
आपण कामानिमित्त ज्या वेळेस प्रवास करतो त्या वेळेस अनेकदा आपल्याला अचानक कोठेही राहण्याची वेळ येऊ शकते. विपणन क्षेत्रात काम करणाऱ्यांना तर अनेकदा या समस्येतून जावे लागते. अशा वेळी आयत्या वेळी हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा होणे शक्य नसते. अगदीच कुठले हॉटेल मिळाले तरी त्यासाठी दाम दुप्पटही मोजावे लागतात. अशा आयत्या वेळीच्या हॉटेल बुकिंगसाठी रूम्स टू नाइट हे अ‍ॅप मदत करू शकते. या अ‍ॅपमध्ये सध्या देशातील सव्वाशेहून अधिक ठिकाणच्या तब्बल ७०० हून अधिक हॉटेल्सच्या बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. या अ‍ॅप कंपनीने थेट हॉटेलांशी करार केले असल्याने अ‍ॅपच्या माध्यमातूनच पूर्ण पैसे भरून बुकिंग करणे शक्य होत असल्याचे कंपनीचे मुख्य उत्पादन अधिकारी कार्तिक प्रभू यांनी सांगितले. तसेच पैसे भरण्यासाठी यामध्ये पे यू नावाचे सुरक्षित पेमेंट गेटवे देण्यात आल्याने ग्राहकांना कोणतीही काळजी करण्याची गरज नसल्याचेही ते सांगतात. या अ‍ॅपमध्ये किमान एक हजार रुपयांपासून ते अगदी सात ते आठ हजार रुपयांच्या रूम्स उपलब्ध आहेत. जसजसे हॉटेलांशी करार होत जातील तसे पर्याय वाढत जातील, असेही प्रभू सांगतात. या अ‍ॅपमधून हॉटेल बुकिंग करण्यासाठी हॉटेलच्या भाडय़ाव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त पैसे ग्राहकांना मोजावे लागणार नसल्याचेही प्रभू यांनी स्पष्ट केले.
विडमेट
तुम्हाला व्हिडीओ गाणी पाहण्याची आवड असेल आणि ती गाणी डाऊनलोड करावयाची असतील तर तुम्ही विडमेट या अ‍ॅपचा वापर करू  शकता. या अ‍ॅपमध्ये व्हिडीओजच्या शेकडो साइट्सवरील व्हिडीओज उपलब्ध होतात. यातून आपण आपल्याला पाहिजे ते व्हिडीओज डाऊनलोड करून घेऊ शकतो. या अ‍ॅपमध्ये तुम्हाला एका वेळी अनेक व्हिडीओ डाऊनलोड करता येणे शक्य होते. इतकेच नव्हे तर व्हिडीओ डाऊनलोड करायला लावल्यावर तो व्हिडीओ मागे डाऊनलोड होत राहतो, मग आपण आपली कामे सहजपणे करू शकतो. या अ‍ॅपमधील व्हिडीओजच्या विविध विभागांमुळे यात व्हिडीओ शोधणेही सोपे जाते. हे अ‍ॅप पाच लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी डाऊनलोड केले आहे.
सुपर फाइल मॅनेजर
आपल्या मोबाइलमध्ये मोठय़ा प्रमाणावर माहिती असते. या माहितीचे व्यवस्थापन करणे म्हणजे आपल्यासाठी अनेकदा डोकेदुखी ठरते. तरीही मोबाइलमध्ये आपण फोल्डर करून त्यामध्ये माहिती वेगवेगळय़ा प्रकारे साठवण्याचा प्रयत्न करत असतो. पण जर विविध माहितीसाठी वेगवेगळय़ा रंगाचे लोगो मिळाले आणि त्यानुसार आपण माहिती साठवली तर ती माहिती शोधणेही सोपे जाते. यासाठी अँड्रॉइडवर सध्या उपलब्ध असलेले सुपर फाइल मॅनेजर हे अ‍ॅप खूप लोकप्रिय होत आहे. या अ‍ॅपमध्ये आपल्याला व्हिडीओ, गाणी, छायाचित्रे आदी वेगवेगळय़ा विभागांसाठी वेगवेगळय़ा गोष्टी देण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर हे अ‍ॅप आपली मोबाइल डिरेक्टरीही खूप चांगल्या प्रकारे हाताळते. यामुळेही आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती व्यवस्थापन करता येणे शक्य होते. तसेच यामध्ये कुरिअरची सुविधा देण्यात आली आहे. म्हणजे आपण एखादी फाइल नेटवर्क नसतानाही हे अ‍ॅप असलेल्या व्यक्तीशी शेअर करू शकतो. या अ‍ॅपमध्ये माहिती काँप्रेस करून साठवली जाते. यामुळे फोनमध्ये अधिक जागा उपलब्ध होणेही शक्य होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2015 6:32 am

Web Title: smart apps
Next Stories
1 वीओ.. वीओ..
2 झिओमीचा ‘एमआय नोट’ स्मार्टफोन! आयफोन ६ला टक्कर
3 लिनोवोचा स्वस्तातला ४जी स्मार्टफोन!
Just Now!
X