12 December 2017

News Flash

स्मार्ट पॉइंट अ‍ॅण्ड शूट

फुजी फिल्मने भारतीय बाजारपेठ आता अतिशय गांभीर्याने घेतली असून त्यांनी अलीकडच्या काळात बरीच उत्पादने

Updated: December 3, 2012 11:03 AM

फुजी फिल्मने भारतीय बाजारपेठ आता अतिशय गांभीर्याने घेतली असून त्यांनी अलीकडच्या काळात बरीच उत्पादने वेगात या बाजारपेठेत आणली आहेत. खास करून पॉइंट अ‍ॅण्ड शूट या प्रकारामध्येही त्यांनी बरेच वैविध्य
देण्याचा प्रयत्न केला आहे. इतर कंपन्यांपेक्षा चांगले पर्याय आणि कमी किंमत हे त्यांचे वैशिष्टय़ म्हणायला हवे. आता त्यांनी फुजी फिल्म एचएस३० ईएक्सआर हा कॅमेरा बाजारपेठेत आणला आहे. याची लेन्स बदलता येत नाही. मात्र असे असले तरी त्या एकाच लेन्समधून मिळणारे वैविध्य अधिक आहे.
२४ ते ७०० मिमी.
एकाच लेन्समध्ये २४ ते ७०० मिमी. असे वैविध्य यात असून ३० एक्स या झूममुळे ही क्षमता प्राप्त झाली आहे.
१६ मेगापिक्सेल क्षमतेचे फोटो यातून टिपता येतात. यात मॅन्युअल म्हणजेच आपण स्वत: ठरवून सेटिंग करून फोटो टिपण्याची आणि तसेच मॅन्युअल पद्धतीने फोकस करण्याची सोयही कंपनीने दिली आहे. ऑटो सेटिंगवर काम करताना अनेकदा आपल्या हातात काहीच नसते, मग फोटोग्राफी शिकलेल्या पण व्यावसायिक नसलेल्यांना मॅन्युअलचा पर्याय नसल्याने त्यांची अडचण होते. ती टाळण्यासाठीच ही सोय या मॉडेलमध्ये देण्यात आली आहे.
सुपर मॅक्रो
अनेकांना फोटोग्राफी करताना क्लोजअप्स टिपायला खूप आवडतात, अगदी साधी मुंगीदेखील या क्लोजअपमध्ये खूप छान भासमान होते. हे लक्षात घेऊनच अलीकडे सर्वच कॅमेऱ्यांना हा मोड दिलेला असतो. फुजीनेही त्यांच्या या मॉडेलमध्ये एक इंच अंतरावरून क्लोजअप टिपता येईल, अशी सुपर मॅक्रोची सोय उपलब्ध करून दिली आहे.
कमी प्रकाशात फोटो टिपायचा असेल तर त्यासाठी आयएसओ १२,८०० ची सोय आणि शिवाय इमेज स्टॅबिलेशनची सोयही देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे अलीकडे फिल्मशिवाय सारे काही डिजिटल होत असल्याने अनेकांना फोटो किती टिपले आहेत, याची चिंता नसते. त्यामुळे कोणताही क्षण न गमावण्यासाठी कॅमेरा सातत्याने कंटिन्युअस शूट मोडवर ठेवला जातो. आता ही सोय या मॉडेलमध्येही देण्यात आली आहे. हा कॅमेरा प्रतिसेकंद आठ फ्रेम्स या वेगात काम करण्याची क्षमता राखतो. शिवाय मूव्ही मोडही आहेच.
भारतीय बाजारपेठेतील किंमत :
रु. २६,९९९/-    
प्रतिनिधी
techit@expressindia.com

First Published on December 3, 2012 11:03 am

Web Title: smart point and shoot