प्रश्न – माझ्याकडे सॅमसंगचा फोन आहे. त्याची बॅटरी खूप लवकर लो होते. बॅटरीची क्षमता कशी वाढवता येईल किंवा दुसरी जास्त क्षमतेची बॅटरी आपण यामध्ये वापरू शकतो का?
– महादेव चव्हाण
उत्तर – बॅटरी लो होणे हा सर्व अँड्रॉइड फोनचा प्रॉब्लेम आहेच. यामुळे कंपन्यांनी किमान १५०० एमएएचची बॅटरी देणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या फोन्समध्ये ही क्षमता खूप कमी देण्यात आली आहे. यामुळे ही अडचण अनेकांना जाणवत आहे. त्यावर उपाय म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो. ती म्हणजे प्रवासात आपण आपले इंटरनेट बंद ठेवले तर बॅटरीची क्षमता वाढू शकते. जर आपण इंटरनेट सुरू ठेवले तरी सिंक ऑफ करून ठेवा. ज्या वेळेस आपल्याला गरज असेल तेव्हा आपण सिंक ऑन करून आपले आलेले सर्व ई-मेल पाहू शकतो. यामुळे आपली बॅटरी कमी खर्च होऊ शकते. याशिवाय आपण अॅप्स बंद करताना बहुतांश वेळा होमस्क्रीनचे बटण वापरतो. त्यामुळे आपले अॅप्स पूर्ण बंद न होता ते सुरूच राहते. यामुळे अॅप्स वापरून झाले की, आपण कधीही बॅकचे बटण दाबावे, जेणेकरून ते अॅप्स पूर्ण बंद होतील. तसेच बॅटरी जेव्हा लो अगदी २० टक्के वगैरे असते आणि लवकर चाìजग उपलब्ध होणार नसेल तेव्हा ब्राइटनेस थोडा कमी करून ठेवावा, जेणेकरून बॅटरी कमी खर्च होत राहील. तुम्ही विचारले की, जास्त क्षमतेची दुसरी बॅटरी वापरता येईल का? तर तसे करणे आपल्याला शक्य नाही, कारण फोनमधील हार्डवेअर हेही बॅटरीची क्षमता लक्षात घेऊन काम करत असते. यामुळे आपल्याला दुसरी बॅटरी वापरणे तसे शक्य होणार नाही. याचबरोबर आपण बॅटरीची क्षमता वाढवूही शकत नाही.
– तंत्रस्वामी
संग्रहित लेख, दिनांक 24th Nov 2015 रोजी प्रकाशित
बॅटरी क्षमता वाढविण्यासाठी उपाय सुचवा.
माझ्याकडे सॅमसंगचा फोन आहे. त्याची बॅटरी खूप लवकर लो होते.
Written by मंदार गुरव
First published on: 24-11-2015 at 00:47 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to increase capacity of battery