स्मार्ट किट
आता सध्या सुटय़ा असल्याने शिक्षण, पाटी, पुस्तक या सर्वाना बुट्टी असेल नाही पण दुसऱ्या मार्गाने मेंदूला बौद्धिक खाद्य देता येते. मुलांनो, एखादा अवयव वापरला नाही तर त्याचे कामच मंद होऊ लागते. त्यामुळे कोडी सोडवायची सवय तुम्हाला असेल. स्मार्ट किट हे असेच संकेतस्थळ आहे. तुमच्या वयानुसार कोडी त्यात दिली आहेत. चांगले गेम व कोडी असल्याने तुम्हाला हा अनुभव चांगला वाटेल. आजकाल िहसक गेम बरेच दिसतात तसे मात्र इथे काही नाही. झटपट विचार, तर्कशास्त्र, भौतिकशास्त्र, मेंदूला कोडी, लपवलेल्या वस्तूची कोडी, फरक ओळखा हे सगळे त्यात आहे. काही कोडय़ांचे तुम्ही िपट्र आऊट घेऊ शकता संकेतस्थळाचे नाव आहे-  www.smart-kit.com.

मुलांसाठी नवीन माहिती
मुलांना बाधक ठरणार नाही अशी माहिती असलेले thekidsshouldseethis.comसंकेतस्थळ अनेक गमतीदार विषयावर चतुरस्र माहिती देणारे आहे. काही यंत्रे कशा काम करतात याच्या दृश्यफिती, खेळ, भाषा शिकण्याच्या व्हिडीओ त्यात आहेत. जरूर हे संकेतस्थळ बघा.
चित्रकार व्हा
चित्रकलेची मुलांना आवड असते पण शिकवायला अगदी सुटीतील महागडे छंद वर्गच लावले पाहिजेत, हा एकच उपाय नाही. मुले संकेतस्थळावर चित्रे काढण्याचे धडे घेऊ शकतात. प्राणी, डिस्नेतील प्राणी, पौराणिक व्यक्ती, सुपरहीरो, निसर्गचित्रे यात तुम्ही काढू शकेल. यातील माहिती वाचून तुम्ही चित्रे काढू शकता, प्रयत्न तर करून बघा. फक्त त्यातील जाहिरातींच्या िलकवर क्लिक करू नका, फुलीवर क्लिक केल्या तर जाहिराती निघून जातात. संकतेस्थळाचे नाव आहे. http://www.my-how-to-draw.com किंवाhttp://www.kerproof.com dIaY½FF http://kids.tate.org.uk/

कंटाळा आलाय?
मुलांना सुटीत कंटाळा येतो व काही तरी करून बघण्याची त्यांची इच्छा असते. त्यांना नवीन काही तरी केल्याचा आनंद मिळतो त्यासाठी Nickelodeon Kid Site, Funology    ही दोन संकेतस्थळे जरूर बघावीत. डिस्नेच्या वतीनेही babble.comया संकेतस्थळाच्या वतीनेplus, Disney Family, Kaboose, Funschool.com, Go.com ही माहिती – मनोरंजनाने भरलेली संकेतस्थळे आहेत. मुलांना Nasa App, Feel electric ही अॅपसही अनुक्रमे माहिती व मुलांच्या भावनांना स्थान देणारी आहेत

मराठी संकेतस्थळे

Chandamama.com, Babloo.com  या दोन्ही संकेतस्थळांवर मुलांसाठी मराठीत गोष्टी व इतर गमतीशीर बाबी आहेत.
http://kusumavali.org,
http://puldeshpande.net,
http://www.gadima.com,
http://www.savarkar.org,
http://www.avkashvedh.com,
http://marathipustake.org,
http:www.athavanitil-gani.com,
http://www.balsanskar.com,
http://www.funorkutscraps.com ही दोन संकेतस्थळे जरूर बघावीत. ढटढ creative studioz हे मराठी शिकण्याचे अ‍ॅप आहे. marathi kavita for kids, Marathi Balgeet, ¸Chitrakosh,  http://www.m4marathi.in, jokes-adda.blogspot.com यावर मराठी कविता, बडबडगीते, मंगेश पाडगावकर व शांता शेळके यांची मुलांसाठी गाणी, विनोद असा बराच खजिना आहे. लहान मुलांना चित्रावरून शिकता येतील अशीही सोय आहे. गुगल प्लेवर मुलांसाठी काही अ‍ॅप आहेत.