ब्रिटानिका हा इंग्रजी भाषेतला सर्वात जुना ज्ञानकोश. १७६८ सालापासून सामान्यज्ञानाचा खजिना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हा कोश करत आहे. पूर्वी हा छापील स्वरूपात प्रसिद्ध होत असे. २०१० साली ‘ााची पंधरावी व शेवटची छापील आवृत्ती प्रसिद्ध झाली, ज्यामध्ये एकूण ३२ खंड होते.
http://www.britannica.com/ ह्य़ा वेबसाइटवर हा कोश ऑनलाइन उपलब्ध आहे. येथे बारा हजारांहून अधिक लेख उपलब्ध आहेत. या कोशाच्या सर्चबारमधे तुम्ही हव्या असलेल्या विषयाची माहिती शोधू शकता. उदाहरणार्थ, सर्चबारमधे शिवाजी असे टाकल्यावर Shivaji (Indian King) असा पर्याय उपलब्ध होईल. हा पर्याय निवडल्यावर शिवाजी महाराजांवरील लेख वाचायला मिळेल. तसेच Earthquake  किंवा Tsunami असे शब्द शोधल्यास त्यावरील लेख, फोटो, व्हिडीओ इत्यादी बघायला मिळतात.
 Popular Topics या भागात ताज्या घडामोडी तसेच लोकप्रिय विषयांबद्दल वाचायला मिळते. तसेच प्रश्नमंजूषाही सोडवायला मिळतात.
याखेरीज Quizzes भागात भूगोल, इतिहास, संगीत, भाषा इत्यादी विषयांवर अंदाजे आठ ते दहा प्रश्न विचारले जातात. प्रश्नाचे उत्तर दिलेल्या चार पर्यायांतून दहा सेकंदांत निवडायचे असते. यानंतर प्रश्नाचे योग्य उत्तर त्याच्या संक्षिप्त माहितीसह तुम्हाला वाचायला मिळते.
Galleries  ह्य़ा भागात ‘जगातील सात नवी आश्चय्रे’, ‘गरुडांचे प्रकार’ तसेच Lists  या भागात ‘आठ उडू न शकणारे पक्षी’, ‘भारतातील सहा शास्त्रीय नृत्यप्रकार’ अशी मनोरंजक माहिती उपलब्ध आहे. वर्गवारी केलेले असे अनेक विषय सुंदर छायाचित्रांसह तुम्ही बघू शकता.
वाचलेल्या लेखावर तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता. आवडलेले लेख इतरांबरोबर शेअर किंवा ईमेल करता येतात. तसेच त्याची िपट्रदेखील घेता येते.
अतिशय सुंदर चित्रांच्या मदतीने विविध विषयांवरील आकर्षक माहिती देणारी http://www.dkfindout.com/ ही आणखी एक साइट.
याा साइटच्या सर्च बॉक्समधे तुम्ही musical instruments  असे टाइप केल्यास तीसहून अधिक रिझल्ट्स मिळतील. Strings  असे शोधलेत तर गिटार, व्हायोलिन अशी तंतुवाद्य्ो त्यांच्या चित्रांसहित बघायला मिळतील.
समजा तुम्ही इलेक्ट्रिक गिटारवर क्लिक केलेत तर त्या वाद्याच्या प्रत्येक भागाचे नाव आणि माहिती वाचायला मिळेल. त्यातून निघणारे सूरदेखील ऐकायला मिळतील.
या साइटवर हाताळल्या गेलेल्या विषयांवर काही ठिकाणी प्रश्नमंजूषादेखील उपलब्ध आहेत. हे प्रश्न साइटवर दिलेल्या माहितीवरच आधारित आहेत.
आणखी एक उपयुक्त साइट म्हणजे http://www.factmonster.com/.येथे माहितीचा खजिना आहेच. त्याबरोबरच क्रॉसवर्ड पझल, प्रश्नमंजूषा, Hangman  असे बुद्धीला चालना देणारे खेळही आहेत. या साइटने कोलंबिया एनसायक्लोपीडियातील पन्नास हजारांहून अधिक लेख उपलब्ध करून दिलेले आहेत.
– मनाली रानडे
manaliranade84@gmail.com