News Flash

एटीएम वापरताना..

एटीएम अर्थात ऑटोमेटेड टेलर मशिनने आपले अर्थकारण अतिशय सहज आणि जलद केले आहे.

एटीएम अर्थात ऑटोमेटेड टेलर मशिनने आपले अर्थकारण अतिशय सहज आणि जलद केले आहे. पूर्वी बँकेतून पैसे काढायचे म्हणजे एक प्रकारचा द्राविडी प्राणायमच होता. आधी धनादेश घेऊन बँकेत जा, मग चेक सादर करून टोकन घ्या आणि मग टोकन नंबर येईपर्यंत वाट पाहा, अशी वेळखाऊ प्रक्रिया बँक खातेदारांना पार पाडावी लागत होती. परंतु एटीएम आल्यापासून ही व्यवस्था साफ मोडीत निघाली. गेल्या आठवडय़ात ५०० व एक हजाराच्या नोटा बाद झाल्यानंतर जो गोंधळ उडाला आहे, तो पाहता आज जर एटीएमसारखी यंत्रणा नसती तर, काय चित्र निर्माण झाले असते, याची प्रचीती येते.

एटीएमही बँकिंग प्रणालीने ग्राहकाला दिलेली सर्वात चांगली सेवा आहे. मात्र ती पूर्णपणे सुरक्षित आहे असे नाही. किंबहुना ग्राहकाच्या किंवा एटीएमधारकाच्या निष्काळजीपणा, अज्ञानामुळे एटीएमची सुविधा ग्राहकासाठी आपत्ती ठरू शकते. प्रगत तंत्रज्ञानामुळे एटीएम यंत्रांची सुरक्षितताही कमी पडू लागली आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत एटीएममधून पैशांची लूट करणारे अवजड हत्यारे, स्फोटके यांचा वापर करत असत. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे यंत्राला अजिबात धक्का न लावता त्यातील रक्कम लंपास करणे शक्य झाले आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्ड हे गुन्हेगारांचे मोठे ‘टार्गेट’ आहेत. या कार्डाचा वापर उपयुक्त आहेच, पण त्यामुळे कार्डधारकाची माहिती चुकीच्या हातांमध्ये पडण्याचीही भीती आहे. अशा वेळी नेमकी काय काळजी घ्यावी किंवा काय करणे टाळावे, हे सांगण्याचा हा प्रयत्न..

काय कराल?

 • डेबिट अथवा क्रेडिट कार्डाचा पिन अर्थात पासवर्ड वेळोवेळी बदला.
 • शक्यतो तुमचे कार्ड ज्या बँकेचे आहे, त्याच बँकेच्या एटीएमचा वापर करा. अन्य बँकांच्या एटीएम यंत्राचा वापर करताना आपल्या नकळत आपली माहिती त्रयस्थ बँकेकडे जमा होत असते. तिचा गैरवापर होऊ शकतो.
 • तुमचे परदेशात जाणे-येणे अजिबात होत नसेल तर, आपल्या बँकेला फोन करून परदेशांतील तुमच्या कार्डचा ‘अ‍ॅक्सेस’ पूर्णपणे बंद करून टाका. ज्या वेळी तुम्हाला परदेशात जायची वेळ येईल, तेव्हा तुम्ही हे र्निबध ठरावीक काळापुरते हटवण्याची सूचना बँकेला करू शकता.
 • परदेशात डेबिट कार्डाचा वापर केला असल्यास, मायदेशी परतल्यानंतर कार्डचा पिन अवश्य बदला.
 • एटीएम केंद्रात शिरताना तुमच्याशिवाय अन्य कोणीही तेथे नाही, याची खात्री करून घ्या.
 • तुमच्या खात्यावर अथवा कार्डशी संबंधित कोणताही संशयास्पद व्यवहार वा सूचना वाटल्यास बँकेला त्वरित त्याची सूचना द्या.
 • रात्रीच्या वेळेस एटीएममध्ये जायचे असल्यास ओळखीच्या व्यक्तीला सोबत असू द्या.
 • तुम्ही इंटरनेटवरील व्यवहारांसाठी कार्डचा वापर करत असाल तर, आपल्या संगणकावरील अँटिव्हायरस अद्ययावत करून घ्या. तुमचा संगणकही नियमितपणे अपडेट करा.

काय टाळाल?

 • डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा पिन अथवा पासवर्ड स्वत:च्या अथवा कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या नावांचा ठेवू नका. तुमची जन्मतारीखही पिन म्हणून नोंदवू नका. अशा प्रसंगी तुमची माहिती असलेल्या व्यक्तीकडून कार्ड हाताळले जाण्याची भीती असते.
 • आर्थिक आमिषे, प्रलोभने अथवा जाहिराती असलेले ई-मेल शक्यतो ओपन करू नका. तुमचे खाते असलेल्या बँकांकडून येणारे मेल्सवगळता अन्य बँकांच्या ई-मेलला खातरजमा न करता प्रतिसाद देऊ नका.
 • तुमची आर्थिक माहिती वा तपशील ई-मेल, फोन अथवा मेसेजद्वारे कोणालाही कळवू नका.
 • दुकानात कार्ड स्वाइप करताना आपल्या कार्डाचा पिन स्वत:च मशीनवर नोंदवा. दुकानदाराला सांगू नका.
 • एटीएममधील व्यवहार झाल्यानंतर येणारी पावती काढून स्वत:जवळ ठेवा अथवा नष्ट करा. मात्र ती मशीनमध्ये तशीच सोडून जाऊ नका.
 • ज्या एटीएम केंद्रात पुरेसा प्रकाश नसेल तेथे कार्डाचा वापर करणे शक्यतो टाळा.

 

– नीरज बिजलानी

सीईओ, टॉप्स ग्रप, इंडिया

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 3:19 am

Web Title: few steps to withdrawal cash from atm
Next Stories
1 डेटामधील ‘भ्रष्टाचार’
2 मोबाइल सुरक्षेची गुणकारी मात्रा
3 वेबब्राउजर्सचे ‘बाहुबली’
Just Now!
X