News Flash

आयफोनचे ‘सप्त’सूर!

जगभरातील तंत्रप्रेमींमध्ये उत्सुकता असलेला आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस

जगभरातील तंत्रप्रेमींमध्ये उत्सुकता असलेला आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस

७ ऑक्टोबर रोजी भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. याची किंमत ६० हजार रुपयांपासून पुढे असणार असून या नव्या फोनमध्ये अ‍ॅपलने नेमके काय बदल केले आहेत. जुन्या आयफोन ६पेक्षा यात काय फरक आहे हे जाणून घेऊयात.

अ‍ॅपलने बाजारात दाखल केलेला आयफोन ७ हा कंपनीसाठी भविष्याची वाटचाल निश्चित करणारा आहे. या फोनचा मोठा भाऊ अर्थात आयफोन ७ प्लस यामध्येही कंपनीने काही महत्त्वपूर्ण बदल केले असून हे बदल आत्तापर्यंत आयफोन न वापरणाऱ्यांनाही मोहात पाडणारे आहेत. आयफोन ७मध्ये ४.७ चा रेटिना डिस्प्ले थ्रीडी टचसह देण्यात आला आहे. या फोनमध्ये आयफोन ६च्या तुलनेत अधिक ब्राइटनेस देण्यात आला आहे. नव्या फोनची रचना आयफोन ६ एससारखी असून त्यात अगदी थोडक्या बाबींमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे या नव्या फोनमध्ये हेडफोन जॅक देण्यात आलेला नाही. आयफोन ७मध्ये वायरलेस हेडफोन देण्यात आले आहे. याचबरोबर अँटेनाची जागा बदलण्यात आली असून ती वरच्या बाजूस करण्यात आली आहे. हा नवा फोन आयफान ६ एसच्या तुलनेत वजनाने कमी आहे. मात्र आकार तेवढाच ठेवण्यात आला आहे.

आयफोन ७मध्ये आयफोन ६एसच्या तुलनेत हार्डवेअरमध्ये अधिक चांगले बदल करण्यात आले आहे. आयफोन ६मध्ये ए चिपसेट डय़ुएलकोर १.८४ गीगाहर्टझचा सीपीयू आणि पॉवर व्हीआर जीटी ७६००चा जीपीयू वापरण्यात आला आहे. मात्र आयफोन ७मध्ये ए१० फ्यूजन चिपसेट एम १० मोशनसह प्रोसेसरसह देण्यात आला आहे. क्वाड कोअर सीपीयू, सिक्स कोर जीपीयू आणि दोन जीबी रॅम वापरण्यात आला आहे. या नव्या सीपीयूमुळे आयफोन एसच्या तुलनेत फोनचा काम करण्याचा वेग तब्बल ४० ते ५० टक्क्यांनी वाढणार आहे. नव्या आयफोनमध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे तो कॅमेराचा. गेल्या दोन वर्षांपासून सॅमसंग हा मोबाइल कॅमेऱ्यासाठी जगभरात सर्वाना टक्कर देणारा ब्रँड ठरला आहे. याच ब्रँडला उत्तर देण्यासाठी अ‍ॅपलने आपल्या कॅमेरामध्ये काही बदल केले आहेत. आयफोन ७मध्ये बारा मेगापिक्सेल कॅमेरा, फोकस पिक्सेल, ऑप्शन इमेज स्टॅबिलायझेशन, क्वाड एलईडी डय़ुएल टोन फ्लॅश, फोर के व्हिडीओ रेकॉर्डिग अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये डय़ुएल टोन फ्लॅश आणि अपार्चरमध्ये फरक करण्यात आला आहे. या फोनमध्ये फ्रंट कॅमेरा आयफोन ६एसच्या तुलनेत दोन मेगापिक्सेलने वाढविण्यात आला आहे. नव्या आयफोनमध्ये बॅटरीची विशेष दखल घेण्यात आली आहे. आयफोन ६एसप्रमाणेच यामध्येही लिथियम इऑन बिल्ट इन बॅटरी देण्यात आली आहे. नव्या फोनमध्ये संपूर्ण बॅटरी चार्ज झाल्यावर वायररहित टॉक टाइम थ्रीजीवर चौदा तासांचा मिळतो, तर इंटरनेट वापर करत असताना थ्रीजी आणि फोरजीसाठी बारा तासांची क्षमता बॅटरीमध्ये देण्यात आली आहे, तर वाय-फायवर हा फोन चौदा तास काम करू शकणार आहे. वायरलेस व्हिडीओ प्ले बॅक क्षमता तेरा तासांची आहे, तर गाणी ऐकण्याची क्षमता ४० तासांची आहे. आयफोन ७ हा आपल्याला ३२ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी साठवणूक क्षमतेमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय या फोनमध्ये जलप्रतिवर्धक क्षमता अधिक वाढविण्यात आली असून आपण पाण्यात जरी हा फोन नेला तरी तो योग्य प्रकारे वापरता येऊ शकणार आहे.

आयफोन ७प्लस

आयफोल ७प्रमाणेच प्राथमिक सुविधा असलेला हा फोन अ‍ॅपल फॅबलेट घेणाऱ्यांसाठी पर्याय ठरू शकणार आहे. हा फोनही अ‍ॅपल ६एस प्लसच्या तुलनेत हलका असून यामध्ये काही नवे फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये स्टीरीओ स्पीकरचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये जल आणि धूळ प्रतिरोधक प्रणाली वापरण्यात आली आहे. यामध्ये मेटल बॉलडीचा वापर करण्यात आला आहे. आयफोन ७प्लसमध्येही आयफोन ७ प्रमाणेच प्रोसेसर वापरण्यात आला आहे, तर बॅटरी क्षमतेतही आयफोन ७प्रमाणे वाढ करण्यात आली आहे. याचा डिस्प्ले ५.५ इंचांचा रेटिना असून त्याला पूर्ण एचडी रिझोल्यूशन वापरण्यात आले आहे. याचा कॅमेरा आयफोन ७ पेक्षाही अधिक सक्षम करण्यात आला आहे. यामध्ये बारा मेगापिक्सेलचे दोन सेन्सर्स देण्यात आले आहेत. याशिवाय यामध्ये वाइड अँगल लेन्स आणि टेलिफोन लेन्स देण्यात आला आहे. यामुळे फोनमध्ये फोटो काढताना झूम करण्याची जी प्रक्रिया आहे ती अधिक जलद होते.

अ‍ॅपल वॉच २

अ‍ॅपल वॉच २ मध्ये अधिक प्रगत अशा सुविधा देणाऱ्या अ‍ॅपल वॉच ओएस ३ चे अनावरण केले. अ‍ॅपल वॉच आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवणाऱ्या अ‍ॅप्सपासून गेमच्या अ‍ॅपचा समावेश करण्यात आला आहे. नवे अ‍ॅपल वॉच हे जलरोधक असणार आहे. यामुळे पोहतानाही हे घडय़ाळ तुम्ही बिनदिक्कत वापरू शकणार आहात. जलप्रतिरोधक करत असताना स्पीकरची अडचण ही नेहमीच जाणवत असते. मात्र यावरही तोडगा काढत कंपनीने सर्वोत्तम जलरोधक घडय़ाळ दिले आहे. यामध्ये बिल्ट इन जीपीएस देण्यात आले आहे. यामुळे हायकिंग करणाऱ्यांना विशेष मदत होणार असल्याचा विश्वास कंपनीतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. डय़ुएल कोर, दुप्पट ब्राइटनेस यांसारख्या सुविधांमुळे हे वॉच अधिक जलद आणि अत्याधुनिक झाले आहे. यामध्ये क्रीडा विभागासाठी अ‍ॅपल वॉच नाइकी प्लस हे विशेष घडय़ाळ अ‍ॅपलने बाजारात आणले आहे. या अ‍ॅपल वॉचची किंमत २६९ अमेरिकन डॉलर्स इतकी असणार आहे. यानंतर टिम कूक यांनी आयफोनची घोषणा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला आयओएस १० चे फीचर्स सांगून आयफोन ७चे अनावरण केले. या फोनमध्ये १२ मेगापिक्सेलचा डय़ुएल लेन्स कॅमेरा देण्यात येणार आहे. या फोनमधून अँटेना बँड पूर्णपणे घालविण्यात अ़ाला आहे. यामध्ये वापरण्यात आलेले होम बटन हे आत्तापर्यंतच्या आयफोनपेक्षा वेगळे असून ते फोर्स सेन्सेटिव्ह आणि टॅपटिक इंजिनसह देण्यात आले आहे.

– प्रतिनिधी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 2:21 am

Web Title: iphone 7 and iphone 7 plus hands review
Next Stories
1 फोनचा हँगओव्हर..
2 जिओजेब्रा
3 पेन ड्राइव्ह राइट टू प्रोटेक्ट झाला
Just Now!
X