News Flash

आता व्हॉट्सअॅप मेसेजेससाठी बोल्ड आणि इटॅलिकचा पर्याय

हे फिचर्स व्हॉट्सअॅपच्या २.२.५३५ या व्हर्जनमध्ये उपलब्ध असतील.

मोबाईल आणि स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेले व्हॉटसअॅप आता नव्याने अपडेट झाले आहे. व्हॉट्सअॅपच्या या नव्या व्हर्जनमध्ये युजर्सना वर्ड फाईलप्रमाणे विशिष्ट अक्षराला किंवा वाक्याला बोल्ड, इटॅलिक किंवा स्ट्राईकथ्रू करता येणार आहे. यामध्ये शब्दाच्या सुरूवातीला आणि अखेरीस * हे चिन्ह (asterisk) टाकून शब्द किंवा वाक्य बोल्ड करता येईल. याशिवाय, अक्षरांच्या मागेपुढे _(अंडरस्कोअर) टाईप केल्यास संबंधित वाक्य इटॅलिकमध्ये दिसेल. तसेच ~ (टिल्ड) हे चिन्ह वापरून अक्षरांना स्ट्राईकथ्रू इफेक्ट देता येईल. हे फिचर्स व्हॉट्सअॅपच्या २.२.५३५ या व्हर्जनमध्ये उपलब्ध असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2016 12:12 pm

Web Title: new features of whatsapp
टॅग : Smartphone,Whatsapp
Next Stories
1 स्मार्टफोनला ‘सौरशक्ती’
2 आभासी जगात रमवणारा फोन
3 लॅपटॉपची बॅटरी ‘टॉप’
Just Now!
X