मायक्रोसॉफ्टच्या संगणकीय कार्यप्रणालीतील (ऑपरेटिंग सिस्टीम) सर्वात अद्ययावत अशा ‘विण्डोज १०’ची आवृत्ती मोफत इन्स्टॉल करण्याची मुदत या आठवडय़ात संपत आहे. विण्डोज ७ किंवा ८.१ ऑपरेटिंग सिस्टीम वापरणाऱ्यांसाठी ‘विण्डोज १०’ मोफत पुरवली जात आहे. मात्र शुक्रवारनंतर(२९ जुलै) त्यासाठी पैसे मोजावे लागतील. या पाश्र्वभूमीवर ‘विण्डोज १०’ आपल्या संगणकावर कसा इन्स्टॉल करायचा याचा हा तपशील..
कोणती आवृत्ती? – ‘विण्डोज १०’च्या सध्या सात वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत. यापैकी ‘विण्डोज १० होम’ आणि ‘विण्डोज १० प्रो’ या दोन महत्त्वाच्या आहेत. ‘विण्डोज १० होम’ ही घरातल्या संगणकांसाठी साजेशी आवृत्ती आहे. तुमच्या संगणकावर सध्या ‘विण्डोज ७’ची ‘होम बेसिक’ किंवा ‘होम प्रीमियम’ आवृत्ती असल्यास तुम्हाला ‘विण्डोज १० होम’ ही आवृत्ती मोफत ‘अपग्रेड’ करता येईल.
‘विण्डोज १० प्रो’ ही विशेषत: कार्यालयीन वापरासाठी बनवण्यात आलेली आवृत्ती असून त्यामध्ये ‘रिमोट डेस्कटॉप’, जास्त ‘डेटा सिक्युरिटी’, ‘एन्क्रिप्टेड फाइल सिस्टीम’ अशा आधुनिक
सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. याशिवाय ‘प्रो’ आवृत्तीतील अपडेट आपल्या आवश्यकतेनुसार लांबणीवरही टाकता येतील (होम आवृत्तीत अशी सुविधा नाही. तेथे अपडेट आपोआप डाऊनलोड आणि इन्स्टॉल होतील).
याखेरीज ‘विण्डोज १० एन्टरप्राइज’ ही आवृत्ती मोठय़ा उद्योगांसाठी बनवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रासाठी ‘विण्डोज १० एज्युकेशन’ ही आवृत्ती उपयुक्त ठरते.
इन्स्टॉलेशन कसे? – ‘विण्डोज १०’ इन्स्टॉल करण्याची प्रक्रिया सरळसोपी आहे. संगणकावर नियमित अपडेट होतात, त्याच पद्धतीने ही ‘अपग्रेड’ प्रक्रिया पार पडते. मात्र त्यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तुमच्याकडे ‘विण्डोज ७’ किंवा ‘८’ची अधिकृत आवृत्ती असेल तर मोफत अपग्रेडमध्ये काहीही अडचण येणार नाही. तुमची आवृत्ती अधिकृत आहे की नाही, हे तुम्हाला डेस्कटॉपवरील टास्कबारमध्ये उजव्या कोपऱ्यात ‘विण्डोज’चा लोगो दिसून येईल. या ‘लोगो’वर क्लिक करून तुम्ही नोंदणी करू शकता. त्यानंतर ‘अपग्रेड’ प्रक्रिया सुरू होईल.
अन्य पर्याय – तुम्ही ‘विण्डोज १०’ची डीव्हीडी आपल्या संगणकावर ‘लोड’ करूनही ही आवृत्ती मिळवू शकतात. याशिवाय पेन ड्राइव्हमध्ये ‘विण्डोज १०’ची आयएसओ इमेज असल्यास त्याच्या मदतीनेही ‘विण्डोज १०’ इन्स्टॉल करता येते. मात्र ही प्रक्रिया काळजीपूर्वक तपासून पाहा, कारण त्यात तुमच्या महत्त्वाच्या फाइल्स हटवल्या जाण्याची भीती असते. त्यासाठी आपल्या संगणकावरील महत्त्वाच्या फाइल्स पेन ड्राइव्ह किंवा पोर्टेबल हार्डडिस्कमध्ये कॉपी करून घ्या.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2016 रोजी प्रकाशित
‘विण्डोज १०’साठी शेवटची मुदत शुक्रवारी
अन्य पर्याय - तुम्ही ‘विण्डोज १०’ची डीव्हीडी आपल्या संगणकावर ‘लोड’ करूनही ही आवृत्ती मिळवू शकतात.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 26-07-2016 at 00:45 IST
मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Last date for windows 10 on saturday